स्पर्धेत इचलकरंजी, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, बार्शी, अहमदनगर आणि मालेगाव या भागांतील स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धा मनोरंजन मंडळ, रोटरी क्लब सेंट्रल आणि दगडूलाल मर्दा फौंडेशनने आयोजित केल्या होत्या. स्पर्धेमधील सर्व स्पर्धकांनी विविध विषयांवरील आशयपूर्ण कविता प्रभावीपणे सादर केल्या. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ प्रा. अशोक दास, रोटरी क्लब सेंट्रलचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. प्रशांत कांबळे व समीर गोवंडे यांच्या हस्ते करण्यात आला. संजय होगाडे यांनी स्वागत केले. अक्षय कांबळे व कपिल पिसे यांनी सूत्रसंचालन केले. वैष्णवी ढवळे हिने परीक्षकांचा परिचय करून दिला. पंडित ढवळे यांनी आभार मानले. रोटरी श्री मानव सेवा केंद्राच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.
फोटो ओळी ३१०१२०२१-आयसीएच-०१
युवा स्पंदन उपक्रमातील स्वरचित काव्यवाचन स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.