त्यांचे प्राथमिक शिक्षण कुमार विद्यामंदिर व माध्यमिक शिक्षण शिवाजीराव खोराटे विद्यालय, सरवडे येथे झाले. आय. सी. आर. ई. चे शिक्षण गारगोटी येथे होऊन त्यांनी बी. ई.( सिव्हिल) ही पदवी व्ही.जे.टी.आय. मुंबई या ठिकाणी घेतली. त्यानंतर त्यांनी आय.आय.टी.रूडकी (उत्तरांचल) याठिकाणी एम्. टेक्. (स्ट्रक्चर)ही पदवी मिळवून गोल्ड मेडल मिळवले.
त्यानंतर त्यांनी मुंबई, दिल्ली, अबुधाबी या ठिकाणी दहा वर्षे जॉब केला. दहा वर्षांनंतर जॉब सोडून देऊन त्यांनी ऑलबोर्ग युनिव्हर्सिटी डेन्मार्क या ठिकाणी आपली पीएच.डी.चा अभ्यास पूर्ण केला. स्ट्रक्चर्सची सुरक्षितता आणि आयुष्यमान कसे मोजावे या विषयांमध्ये अनमोल योगदान दिले आहे. या प्रोजेक्टच्या वतीने तीन वर्षे डेन्मार्कमध्ये काम करण्याची संधी प्राप्त झाली आणि त्यासाठी त्यांना युरोपियन युनियनची स्कॉलरशिप मिळाली. या तीन वर्षांमध्ये दहा महिने विविध देशातही अभ्यास केला. पीएच.डी नंतर ते डी. एन. व्ही. नावाच्या नामांकित कंपनीमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या सौभाग्यवती रेवती त्यांच्याच कार्यालयात काम करतात.