शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

मतदार याद्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर

By admin | Updated: October 1, 2015 00:40 IST

रात्रंदिवस अधिकारी कामात व्यस्त : गुरुवारी सकाळपर्यंत काम पूर्ण होणार, आयुक्तांनी घेतला आढावा

कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी शनिवारी प्रसिद्ध करायची असल्याने प्राप्त हरकतींनुसार त्या दुरुस्त करण्याचे काम रात्रं-दिवस सुरू झाले असून आज, गुरुवारी सकाळपर्यंत कोणत्याही परिस्थितीत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. प्रारूप मतदार याद्यांवर मोठ्या प्रमाणात हरकती आल्यामुळे अधिकारी हादरून गेले असून, आयुक्त पी. शिवशंकर यांनी बुधवारी दुपारपर्यंत चारही विभागीय कार्यालयांत जाऊन व्यक्तिश: कामाचा आढावा घेतला. प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून आल्यामुळे राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवार व त्यांचे समर्थक गोंधळून गेले आहेत. शहरातील ८१ प्रभागांतून १३०२ इतक्या व्यक्तिगत हरकती प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य आघाडीने शहरात २२ हजार ६९६ मतदारांची नावे दुबार असल्याची तर १७ हजार ०६३ मतदारांची नावे ही एक प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे प्रशासनाची झोपच उडाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मतदार याद्यांतील दरुस्त्या करण्याचे काम रात्रंदिवस सुरू आहे. चारही विभागीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी या कामात गुंतल्याने महानगरपालिकेचे दैनंदिन कामकाज ठप्प झाले आहे. क्षेत्रीय कार्यालये आज सुरू होणार निवडणुकीच्या कामाचे विभाजन सात क्षेत्रीय कार्यालयांतून करण्यात आले आहे. प्रत्येक विभागीय कार्यालयाकडे एक निवडणूक निर्णय अधिकारी व तीन साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केले असून आज, गुरुवारपासून ही कार्यालये नियमितपणे सुरू होणार आहेत. या सर्व कार्यालयांत फर्निचरसह आवश्यक ते सर्व साहित्य आजच पोहोचण्याची व्यवस्था केली आहे. निवडणूक कामासाठी नियुक्त केलेल्या चौदांपैकी पाच अधिकारी बुधवारी महापालिकेकडे हजर झाले. अन्य अधिकारीही दोन दिवसांत रूजू होतील, असे सांगण्यात आले. ७०० मतदार यंत्रांची मागणी निवडणुकीसाठी प्रत्येक प्रभागात साधारणपणे पाच मतदान केंद्रे स्थापन केली जाणार आहेत. त्यामुळे ८१ प्रभागांत सर्वसाधारण ४५० च्या आसपास मतदान केंद्रे राहतील, असे गृहीत धरून मनपा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडे ७०० इलेक्ट्रिक मतदान मशीनची मागणी केली आहे. आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाकडून ही यंत्रे उपलब्ध होतील. अंतिम मतदार यादी शनिवारी मतदार याद्यातील दुरुस्त्या करण्याचे काम कोणत्याही परिस्थितीत बुधवारी रात्रीपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आल्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांचीही धांदल उडाली होती. त्यांनी मतदार याद्या दुरूस्तीला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.आयुक्त पी. शिवशंकर यांनी चारही विभागीय कार्यालयांत जाऊन मतदार याद्या दुरुस्तीच्या कामाची माहिती घेतली. शनिवारी दिवसभरात अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.