शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

आंबोली, आंबा घाट बनलेत ‘घातपाताचे केंद्र’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 00:46 IST

एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : घनदाट जंगल, खोल दºया, निसर्गरम्य परिसरासाठी आंबोली, आंबा घाट परिचित आहे. मात्र, खून करून मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचे ठिकाण अशी या घाटांची ओळख आता पुढे येत आहे. गुन्हेगारी टोळक्यांचा वावर या ठिकाणी वाढला असून या घाटांमध्ये अनेक ‘कांड’ घडले आहेत, जे आजही उघडकीस आलेले नाहीत.विवाहबाह्य ...

एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : घनदाट जंगल, खोल दºया, निसर्गरम्य परिसरासाठी आंबोली, आंबा घाट परिचित आहे. मात्र, खून करून मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचे ठिकाण अशी या घाटांची ओळख आता पुढे येत आहे. गुन्हेगारी टोळक्यांचा वावर या ठिकाणी वाढला असून या घाटांमध्ये अनेक ‘कांड’ घडले आहेत, जे आजही उघडकीस आलेले नाहीत.विवाहबाह्य संबंध, आर्थिक किंवा मालमत्ता वाद, पूर्ववैमनस्य, हुंडाबळी, क्षणिक वादातून सुरू असलेल्या खूनसत्राने कोल्हापूर जिल्हा हादरून गेला आहे. सांगली पोलिसांनी अनिकेत कोथळेचा खून करून मृतदेह आंबोली घाटात जाळला. या घटनेनंतर कधी कोणाचा, कशासाठी खून होईल याची शाश्वती आता राहिलेली नाही. आंबोली घाटात एक नव्हे तब्बल चार मृतदेह पाठोपाठ आढळून आले. वर्षापूर्वी स्वप्निल राजन पोवार (रा. जुना बुधवार पेठ) या चांदी व्यावसायिकाचा खून करून मृतदेह आंबा घाटातील विसावा पॉर्इंट येथील पाचशे फूट दरीत टाकला होता. या मृतदेहाचे काही अवयवच पोलिसांच्या हाती लागले. एकामोगाग एक हत्या, आत्महत्या आणि अपघाताच्या घटनांनी आंबोली, आंबा घाट नाहक बदनाम होत आहेत.हत्येचा सुगावा लागू नयेयासाठी घाटांची निवडराजर्षी शाहूंचे पुरोगामी विचार जोपासणाºया जिल्ह्यांत खुनासारखा वाढत्या घटना सुन्न करणाºया आहेत. या घटना रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा कोणतेच पाऊल उचलत नाही. गेल्या वर्षभरापासून कोल्हापुरात खूनसत्र सुरू आहे. हत्या केल्यानंतर त्याचा सुगावा लागू नये, आपल्यापर्यंत पोलिसांचे हात पोहोचू नयेत, त्यांची दिशाभूल व्हावी, यासाठी आरोपी आंबोली-आंबा घाटात मृतदेहाची नियोजनबद्धरित्या विल्हेवाट लावत आहेत. याठिकाणी कधी मृतदेहाचे धडच मिळते, तर हात-पाय आणि डोके गायब असते. कधी संपूर्ण मृतदेह सापडतो; पण चेहरा ठेचून वा जाळून विद्रूप केलेला असतो. अशा गूढ खुनांचे प्रमाण वाढू लागले आहे.तिन्ही जिल्ह्यांच्यापोलिसांची जबाबदारीसिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवर आंबोली घाट आहे तर रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर आंबा घाट आहे. हे दोन्ही घाट असुरक्षित होण्यामागे अनेक कारणे आहेत. नागमोडी घाटरस्ते दोन्ही बाजूंनी जंगलव्याप्त आहेत. एका बाजूला उंच डोंगरकडे तर दुसºया बाजूला खोल दरी त्यामुळे या मार्गावरून जाताना वाहनधारकांना श्वास रोखावा लागतो. दिवसा या मार्गावरून तुरळक रहदारी असते. रात्री सातनंतर या मार्गावर स्मशानशांतता असते. पोलीस कधी फिरकत नाहीत. त्यामुळे हा परिसर गुन्हेगारांचा अड्डाच बनला आहे. या निर्जन परिसराचा अनेकजण गैरमार्गासाठी वापर करत आहे. कोल्हापूरसह सिंधुदुर्ग व रत्नागिरी या तिन्ही जिल्ह्यांचे पोलीस या घटनांना जबाबदार आहेत. त्यांनी तत्काळ सामूहिक बैठक घेऊन खबरदारी घेणे गरजेचे आहे.