शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाईचा आजपासून शारदीय नवरात्रौत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 21:48 IST

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचा शारदीय नवरात्रौत्सव आज, गुरुवारपासून सुरू होत आहे. यानिमित्त पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे जय्यत तयारी करण्यात आली

ठळक मुद्देदेवीच्या पूजा दुर्गासप्तशतीवर आधारित विद्युत रोषणाईचे सायंकाळी उद्घाटन

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचा शारदीय नवरात्रौत्सव आज, गुरुवारपासून सुरू होत आहे. यानिमित्त पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे जय्यत तयारी करण्यात आली असून सकाळी साडेआठ वाजता मंदिरात घटस्थापना होईल तर सायंकाळी साडेसहा वाजता मंदिराला करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यंदाच्या नवरात्रौत्सवात श्री दुर्गासप्तशतीवर आधारित श्री अंबाबाईच्या पूजा बांधण्यात येणार आहेत.

आदिशक्ती आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठातील प्रमुख पीठ असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाईचा शारदीय नवरात्रौत्सव प्रसिद्ध आहे. या कालावधीत देशभरातून २५ लाखांहून अधिक भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी येतात. सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर देवस्थान समितीला अध्यक्ष आणि कोषाध्यक्ष मिळाल्याने यंदाचा नवरात्रौत्सव मोठ्या जल्लोषात आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांनी साजरा करण्याचा ‘देवस्थान’चा मानस आहे. पर्यटनवृद्धी आणि भाविकांना सोयी-सुविधा हा उद्देश डोळ््यासमोर ठेवून यंदाच्या नवरात्रौत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून भवानी मंडप परिसरातही विद्युत रोषणाई आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे.

नवरात्रौत्सवाचा आज, गुरुवारी पहिला दिवस असून देवीला पहाटेचा व सकाळचा अभिषेक झाल्यानंतर सकाळी साडेआठ वाजता तोफेच्या सलामीने घटस्थापना होईल. त्यानंतर देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते शासकीय अभिषेक होईल. दुपारच्या आरतीनंतर देवीची शैलपुत्री रूपात बैठी पूजा बांधण्यात येणार आहे. दिवसभर अंबाबाई मंदिराच्या आवारात सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतील. रात्री साडेनऊ वाजता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व अंजली पाटील यांच्या हस्ते पालखीचे पूजन होईल.----------------श्री अंबाबाईच्या नवरात्रौत्सवातील पूजागुरुवार (दि.२१) : श्री शैलपुत्रीशुक्रवार (दि.२२) : दशभूजा महाकाली (खडी पूजा)शनिवार (दि.२३) : अष्टभूजा महालक्ष्मी (कमळातली)रविवार (दि.२४) : अष्टभूजा महासरस्वती (खडी पूजा)सोमवार (दि.२५) : गजारूढ अंबारीतील बैठी पूजा (ललितापंचमी)मंगळवार (दि.२६) : शृंगेरी शारदांबा (बैठी पूजा)बुधवार (दि. २७) : श्री भुवनेश्वरी (बैठी पूजा)गुरुवार (दि २८) : महिषासूरमर्दिनी (अष्टमी)शुक्रवार (दि. २९) : शस्त्रपूजा (खंडेनवमी)शनिवार (दि.३०) : रथारूढ पूजा (बैठी पूजा) (विजयादशमी)------------------यंदा सुवर्ण पालखीचे आकर्षणखासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकाराने साकारण्यात आलेल्या सुवर्ण पालखीचे यंदाच्या नवरात्रौत्सवात विशेष आकर्षण असणार आहे. आज, घटस्थापनेपासून अष्टमीवगळता नऊ दिवस अंबाबाईची उत्सवमूर्ती या सुवर्णपालखीत विराजमान असेल. त्यामुळे यंदा दरवर्षीप्रमाणे देवीची पालखी वेगवेगळ््या आकारात निघणार नाही. मात्र, पालखीला फुलांची सजावट केली जाईल. या पालखीच्या सुरक्षिततेसाठी विशेष पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. याशिवाय ‘देवस्थान’चे सुरक्षा रक्षक तैनात असणार आहेत.----------त्र्यंबोली यात्रा सोमवारीयंदा ललितापंचमी दोन दिवस आहे. मात्र, ज्या दिवशी सहा घटिकांपेक्षा अधिक काळ ललिता पंचमी असते, त्या दिवशी त्र्यंबोली यात्रा साजरी केली जाते. यंदा सोमवारी (दि. २५) त्र्यंबोली यात्रा होणार आहे. या दिवशी सकाळी ७ ते १० या वेळेत अंबाबाईचे धार्मिक विधी केले जातील. १० वाजता तोफेच्या सलामीनंतर अंबाबाईची पालखी त्र्यंबोली देवीच्या भेटीसाठी निघेल. दुपारी १२ वाजता कोहळा छेदन विधी होणार आहे.-------------------अष्टमीचा जागरयंदा अष्टमी गुरुवारी (दि.२८) आहे. या दिवशी रात्री साडेनऊ वाजता अंबाबाई फुलांनी सजविलेल्या वाहनातून नगरप्रदक्षिणेला निघेल. त्यानंतर श्री तुळजाभवानी मंदिरात भेटीवेळी मानाचे विडे देण्याचा कार्यक्रम होईल. नगरप्रदक्षिणा संपल्यानंतर पहाटे चार वाजेपर्यंत देवीचा जागर होईल. शुक्रवारी खंडेनवमीनिमित्त शस्त्र पूजन होईल. शनिवारी सायंकाळी पाच वाजता अंबाबाईची पालखी आपल्या लव्याजम्यानिशी सीमोल्लंघनाला जाईल. रात्री साडेनऊ वाजता पालखी मिरवणूक होईल.------------------पिण्याचे पाणी, अन्नछत्र, आरोग्य केंद्रदेवस्थान समितीतर्फे दर्शनरांगांसाठी वाढीव मंडप उभारण्यात आला आहे. मंदिरासह बा' परिसरात पिण्याच्या पाण्याची सोय आहे. मंदिर परिसरातील उद्यान व शेतकरी संघाच्या इमारतीत प्राथमिक उपचार केंद्र असणार आहेत तर विद्यापीठ गेटसमोर अत्याधुनिक यंत्रणेसह अ‍ॅम्ब्युलन्स सज्ज असेल. महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टतर्फे रोज दहा हजार भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेता येणार आहे.----------------फोटो नं २००९२०१७-कोल-अंबाबाई०१ओळ :दुर्गाशक्तीची महती सांगणाºया शारदीय नवरात्रौत्सवाला आज, गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. उत्सवाच्या पूर्वसंध्येला करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची पंखपूजा बांधण्यात आली. (छाया : आदित्य वेल्हाळ)-----------०२,०३देवीची ज्योत नेण्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपºयांतून तरुण मंडळांचे जथ्थे मंदिरात आले होते.------------इंदूमती-----------