शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अंबाबाईच्या पूजेचा ‘इव्हेंट’

By admin | Updated: November 25, 2014 23:54 IST

भाविकांसाठी सजावटीचे स्थळ : श्रीपूजकांकडून वैविध्यपूर्ण पूजा

इंदुमती गणेश - कोल्हापूर -जगत्जननी अंबाबाईचे मूळ स्वरूप म्हणजे तिची खडी पूजा. मात्र, गेल्या वर्षभरात कधी ‘अन्नपूर्णा’, कधी ‘सरस्वती’बरोबरच विविध औचित्यानुसार विविध देवतांच्या रूपात अशा सरासरी आठवड्याला किमान दोन दिवस देवीची वैविध्यपूर्ण रूपात पूजा बांधली जाते. त्यामुळे पूजेचे नाविन्य राहत नाहीच शिवाय भाविकांना देवीच्या मूळ स्वरूपाचे नव्हे, तर श्रीपूजकांच्या संकल्पनेतील देवीचे दर्शन घडते. त्यामुळे मूर्तीला धोका पोहोचतो तो वेगळाच. दुसरीकडे श्रीमंत भाविकांच्या वाढदिवसांपासून ते वेगवेगळ्या समारंभाच्या निमित्ताने सजावटी, देखाव्याचे एक स्थळ म्हणून मंदिराचा वापर होत आहे. त्यामुळे मंदिर परिसरात रोजच एक ‘इव्हेंट’ होत आहे. करवीरनिवासिनी अंबाबाईची विविध रूपात पूजा बांधणे हे काही साधे सोपे काम नव्हेच. त्यामागे शास्त्रीय, धार्मिक आधार असावा लागतो. पूर्वी जेव्हा माहिती-तंत्रज्ञानाचा प्रसार झाला नव्हता, त्यावेळीदेखील परंपरागत श्रीपूजक देवीची फुला-पाना-फळातील पूजा बांधत असत. आता इंटरनेटद्वारे जगभरातील शक्तिस्थानांची माहिती मिळते, डिजिटायझेशनसारखे तंत्रज्ञान आले आहे, त्यानुसार पूजा बांधणीतही अधिक आकर्षता आणि भव्य-दिव्यता आली आहे.नवरात्रौत्सवात तर या पूजा भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडतात. मात्र, वैविध्यपूर्ण पूजा सातत्याने दिसू लागल्या की त्यात नाविन्य राहत नाही, असेच काहीसे अंबाबाईच्या पूजांचे झाले आहे. वैविध्यपूर्ण पूजा नित्याच्याच झाल्याने देवीचे साध्या रूपात दर्शन घडणे हीच आता वेगळी पूजा झाली आहे. सण-वाराचे दिवस मान्य केले, तरी गेल्या दोन वर्षांत इतरवेळी कारण नसतानाही अशा वैविध्यपूर्ण पूजा बांधल्या गेल्या आहेत. हक्कदार श्रीपूजकांची एकूण चाळीस घराणी आहेत. काही जणांच्या वाट्याला एक-दोन वर्षांनी एकदा आठवडा येतो. त्यामुळे आपल्याला मिळालेल्या आठवड्याचे वेगळेपण म्हणून देवीची वैविध्यपूर्ण पूजा बांधण्याचा मोह होणे स्वाभाविक आहे. मात्र, या सगळ्या पूजांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भार अंबाबाईच्या मूळ मूर्तीवर पडतो. देवीच्या मूर्तीची सद्य:स्थिती पाहता त्याची काळजी घेतली जाणे गरजेचे आहे. सजावटी, देखावे एखाद्या श्रीमंत भाविकाचा वाढदिवस असला की, देवीसाठी काहीतरी करायचं, या अनावर भावनेतून मंदिरात फुलांची सजावट केली जाते. कधी मिठाईवाले, कधी फळ-फुलांचे व्यापारी, कधी भाविकांचा अट्टाहास म्हणूनही मंदिरात देखावे केले जातात. त्यासाठी सुरक्षा यंत्रणेला वेठीला धरले जाते. शिवाय भाविकांना देवीचे दर्शन व्यवस्थित घेता येत नाही ते निराळेच. पण, फुलांमधून येणारे लहान-मोठे कीटक, निर्माल्य या सगळ्या गोष्टी मंदिराच्या बांधणीवर परिणाम करतात. मंदिर हे भाविकांच्या श्रीमंतीचा किंवा अन्य कोणत्याही देखाव्याचा डामडौल मिरविण्याचे ठिकाण नाही याचे भान राखले जाणे गरजेचे आहे. त्यासाठी देवस्थानने काही नियम, अटी लादल्या पाहिजेत.अंबाबाईच्या मूर्तीची अवस्था आता सर्वश्रृत आहे. देवीच्या मूर्तीवर कोणताही भार न टाकता बांधली गेलेली पूजा एकवेळ ठीक आहे; पण अनेकदा देवीला आठ हात, किंवा बैठी, हातात काही धारण केलेली अशा कोणत्याही रूपात अलंकारिक पूजा बांधली की त्याचे वजन देवीच्या मूर्तीवर पडते. मूर्तीची काळजी घेऊन पूजा बांधल्या जाव्यात. - उमाकांत राणिंगा, मूर्ती अभ्यासकपूर्वी अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या कमी होती. शिवाय नवरात्रात सगळ्याच भाविकांना दर्शनासाठी येता येत नाही. त्यामुळे सणावाराला किंवा इतरवेळी देवीची वैविध्यपूर्ण पूजा बांधली की परस्थ: भाविकाला दर्शनाचा आनंद मिळतो शिवाय पूजा बांधताना मूर्तीच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचा प्रयत्न केला जातो. - केदार मुनिश्वर, श्रीपूजक