शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाईच्या दर्शनासाठी गर्दीचा विक्रम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2016 01:02 IST

शारदीय नवरात्रौत्सव : नऊ दिवसांत २० लाख ७२ हजार भाविकांची उपस्थिती

अंबाबाईच्या दर्शनासाठी गर्दीचा विक्रम! शारदीय नवरात्रौत्सव : नऊ दिवसांत २० लाख ७२ हजार भाविकांची उपस्थिती कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त झालेल्या गर्दीचे सगळे उच्चांक मोडत रविवारी ३ लाख २० हजार भाविकांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. शुक्रवारनंतर ही यंदाच्या नवरात्रौत्सवातील सर्वांत मोठी गर्दी होती. त्यामुळे केवळ मंदिराबाहेरीलच नव्हे तर शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली. गेल्या नऊ दिवसांत २० लाख ७२ हजार ६५ भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. सुटीदिवशी किंवा शुक्रवारी, मंगळवारी भाविकांची गर्दी होणे अपेक्षित असते. त्यात अष्टमी हा दिवस दुर्गेच्या उपासनेचा असल्याने पहाटे चार वाजल्यापासून मंदिरात भाविकांच्या दर्शनरांगा लागल्या होत्या. सकाळी आठ वाजल्यापासून महिला भाविकांची पूर्व दरवाजातील मुख्य दर्शनरांग भवानी मंडपात गेली होती. येथेही पाच ते सहा रांगा करण्यात आल्या होत्या. एरवी कमी असणारी पुरुषांची दर्शनरांगही आज भरून गेली होती. पुरुषांची रांग जोतिबा रोडमार्गे भाऊसिंगजी रोडपर्यंत आली होती. त्यामुळे भाविकांना भर उन्हाचे चटके सोसत देवीदर्शनासाठी उभे राहावे लागले. सगळीकडे गर्दीच गर्दी असल्याने रांगांचे नियोजन करताना पोलिस, कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांंवरही ताण आला. स्वयंसेवी व्यक्ती व संस्थांनी पिण्याच्या पाण्याची सोय केल्याने भाविकांसाठी तो मोठा दिलासा ठरला. मंदिरात कासव चौक आणि गरुड मंडप येथे मुखदर्शनाची सोय करण्यात आली होती. मात्र, येथेही गर्दीवर नियंत्रण ठेवणे अवघड जात होते. पितळी उंबऱ्याबाहेर ढकलाढकलीचे प्रकार घडले. गर्दीचा हा ओघ संध्याकाळपर्यंत सुरूच होता. ’अंबा माता की जय’च्या गजरात नगरप्रदक्षिणा कोल्हापूर : ‘अंबामाता की जय...’चा गजर, पारंपरिक वाद्ये, रांगोळी व फुलांच्या पायघड्या, भालदार, चोपदार, रोशननाईक असा शाही लवाजमा, फुलांनी सजलेले वाहन आणि त्यात अंबाबाईची उत्सवमूर्ती, नागरूपी वाहनावर होणारा फुलांचा वर्षाव... अशा मंगलमय वातावरणात रविवारी रात्री देवीची नगरप्रदक्षिणा झाली. देवीचा हा शाही सोहळा भाविकांनी नजरेत साठविला. फुलांनी सजविलेल्या वाहनात रात्री साडेनऊला देवीची उत्सवमूर्ती विराजमान झाली. पॉप्युलर स्टील वर्क्सचे राजू जाधव त्यांच्या पत्नी मीना जाधव व कुटुंबीयांच्या हस्ते वाहनाचे पूजन झाले. तोफेची सलामी दिल्यानंतर महाद्वारातून नागरूपी वाहन नगरप्रदक्षिणेसाठी बाहेर पडले. महाद्वारातून वाहन गुजरी, भाऊसिंगजी रोडमार्गे भवानी मंडपात आले. या ठिकाणी श्री अंबाबाई व तुळजाभवानीची भेट घडविण्यात आली. त्यानंतर छत्रपती घराण्याकडून आरती करण्यात आली तेथून वाहन गुरुमहाराजांच्या वाड्यावर आले. प्रदक्षिणा मार्गावर श्रीकृष्ण अन्नपूर्णा मित्रमंडळ, हिंदू युवा प्रतिष्ठान, गुजरी कॉर्नर मंडळ, आदी संस्थांनी प्रसादांचे आयोजन केले होते. नो ‘व्हीआयपी’ उत्सवाच्या पहिल्या दिवसापासून देवस्थान समिती व पोलिसांच्या वतीने नागरिकांना व्हीआयपी दर्शनासाठी सोडले जात होते. मात्र, अष्टमी आणि रविवारचा दिवस असल्याने या दोन्ही व्यवस्थापनांनी व्हीआयपी दर्शन बंद ठेवले होते. कोणत्याही भाविकाला आडमार्गाने मंदिरात पाठविले जात नसल्याने किमान एका दिवसासाठी तरी का असेना, हा सर्वसामान्य भक्तांसाठी दिलासा ठरला. वाहतूक कोलमडली मंदिराकडे जाणाऱ्या सगळ्याच मार्गांवर प्रचंड गर्दी असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली. शिवाजी चौक, बिंदू चौक, भवानी मंडप, महापालिका ते अगदी लक्ष्मीपुरीपर्यंत वाहतूक खोळंबली होती. गुजरीत दुचाकी वाहनांचे पार्किंग होत असले तरी येथेही जागा नसल्याने वाहनधारकांची कसरत होत होती. हरवले-सापडले जिल्हा व पोलिस प्रशासनाच्या वतीने भाविकांसाठी वैद्यकीय सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत. गर्दीमुळे भाविकांची व लहान मुलांची चुकामूक होत होती. पोलिस व समितीकडून माईकवर जाहीर केल्याने हरविलेले नातेवाईक सापडले.