शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रौत्सवासाठी अंबाबाइ मंदिराचा परिसर सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 23:57 IST

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात येणाऱ्या लाखो भाविकांना सहजसुलभ दर्शन व्हावे, याकरिता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे मंदिर परिसर स्वच्छता, दर्शनमंडप उभारणी, सीसीटीव्ही कॅमेºयांची सज्जता, धातुशोधक यंत्रे, आदींची तयारी रविवारी पूर्ण झाली आहे. दरम्यान, रविवारी दिवसभर राज्यातील अनेक भागांतून आलेल्या मंडळांनी ज्योत नेली.अवघ्या दोन ...

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात येणाऱ्या लाखो भाविकांना सहजसुलभ दर्शन व्हावे, याकरिता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे मंदिर परिसर स्वच्छता, दर्शनमंडप उभारणी, सीसीटीव्ही कॅमेºयांची सज्जता, धातुशोधक यंत्रे, आदींची तयारी रविवारी पूर्ण झाली आहे. दरम्यान, रविवारी दिवसभर राज्यातील अनेक भागांतून आलेल्या मंडळांनी ज्योत नेली.अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवारी मंदिराच्या परिसरावर ‘तिसरा डोळा’ अर्थात सीसीटीव्हीचे जादा कॅमेरे बसवून घेतले. त्यामुळे भाविकांचे चोरांपासून संरक्षण होणार आहे. याकरिता देवस्थानने विशेष कक्षाचीही स्थापना केली आहे. विविध गायक, भजनी मंडळांना सादरीकरणासाठी गारेच्या गणपतीसमोर व्यासपीठही तयार केले आहे. रविवारी परिसरातील फरशीचीही स्वच्छता केली. भवानी मंडपातील ऐतिहासिक कमानही मनपातर्फे स्वच्छ केली. दरम्यान, परजिल्ह्यांतील शारदीय नवरात्रौत्सव मंडळांनीही ज्योत प्रज्वलित करण्यास प्रारंभ केला. यात बीड, उस्मानाबाद, पुणे, अहमदनगर, आदी जिल्ह्यांतील मंडळांचा समावेश होता.बुधवार (दि. १०)पासून येणाºया लाखो भाविकांची संख्या लक्षात घेता, महालक्ष्मी अन्नछत्रालय व भक्त मंडळाने धर्मशाळा चोवीस तास खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासह अन्नछत्रालयाची वेळही एक तासाने वाढविली आहे. एकाच वेळी आठ हजार भाविकांना प्रसादाचा लाभ घेता यावा, अशी व्यवस्थाही केली आहे. सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत प्रसादाचा लाभ घेता येणार आहे.तिसºया डोळ्याचीनजर अशीमंदिराच्या चारीही दरवाजांसह मंदिरप्रवेश करताना पाच धातुशोधक मेटल डोअर फ्रेम डिटेक्टर, १० हॅँड मेटल डिटेक्टर, परिसरात एकूण ५५ सीसीटीव्ही कॅमेरे, १५ बिनतारी संदेश यंत्रणा अशी सुरक्षितता पश्चिम महाराष्ट्र देवस्थानतर्फे सज्ज केली आहे.यासह देवस्थान समितीच्या कार्यालय, जुना राजवाडा पोलीस ठाणे, इमर्जन्सी कंट्रोल रूम अशा तीन ठिकाणांहून या परिसरातील भाविकांच्या हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे.