शहरं
Join us  
Trending Stories
1
लढाई विरोधकांशी नव्हे, मित्रपक्षांबरोबर; भाजप कार्यशाळेतील सूर; ताकद वाढल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य : शनिवार 07 जून 2025; आजचा दिवस शुभ फलदायी, गोड बोलण्याने कोणाचेही मन जिंकू शकाल
3
भाडेवाढीनंतर महिनाभरात बेस्टचे ५ लाख प्रवासी घटले; महसूल मात्र ७४ कोटीने वाढला
4
२ राजयोगात रवि प्रदोष: सूर्यासारखे तेज मिळेल, भाग्य उजळेल; ‘असे’ करा व्रत, शिव होतील प्रसन्न
5
मिठी सफाई घोटाळाप्रकरणी १५ ठिकाणी छापे; अभिनेता डिनो मोरियाच्या घरावरही धाड
6
Housefull 5: पहिल्या दिवशीच हाऊसफुल कमाई! 'हाऊसफुल ५' सिनेमाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
7
रशियाचा युक्रेनवर भयंकर हल्ला! ४० क्षेपणास्त्रे, ४०० ड्रोन हल्ल्यात चार ठार, २० जण जखमी
8
पाकिस्तानसाठी ६ मे ची रात्र ठरली ‘कयामत की रात’; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात
9
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीत ४५ किलो शुद्ध सोन्याचा वापर; किंमत सुमारे ५० कोटी
10
मणिपूरमध्ये बंदी घातलेल्या संघटनांच्या आठ दहशतवाद्यांना अटक; शस्त्रे, दारूगोळा जप्त
11
विशेष लेख: महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली? अशी निवडणूक विषसमान
12
बँकांना २.५ लाख कोटींची संजीवनी; कर्जांची सोय; अर्थव्यवस्थेत तरलता आणण्यासाठी निर्णय
13
एलॉन मस्क यांचे वडीलही भारताच्या प्रेमात! अयोध्येतील राम मंदिरात येत रामललाचे घेतले दर्शन
14
RBIचे गिफ्ट, स्वस्तात काढा कर्ज! रेपोदरात अर्धा टक्का जम्बो कपात, कमी होणार EMI
15
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
16
अग्रलेख: अर्थव्यवस्थेत सुखद झुळूक! निर्णय अकस्मात; पण त्यामागे स्पष्ट आर्थिक कारणे
17
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
18
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
19
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
20
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा

अंबाबाई शालू लिलाव पाच वर्षांच्या सरासरीवर

By admin | Updated: February 5, 2016 00:50 IST

देवस्थान व्यवस्थापन समितीच्या बैठकीत निर्णय

कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई देवीस नवरात्रौत्सवात तिरुपती-बालाजी देवस्थानकडून आलेल्या मानाचा शालूचा लिलाव हा मागील पाच वर्षांच्या लिलावातील आलेल्या बोलीच्या सरासरीवर व बाजारभावातील सद्य:स्थितीच्या दरावर काढण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. ही बैठक जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्रतिवर्षाप्रमाणे करवीरनिवासिनी अंबाबाई देवीस आंध्र प्रदेशातील तिरुपती-बालाजी देवस्थानकडून मानाचा शालू देण्यात आला होता. यंदा या शालूचा लिलावही नवरात्रौत्सवानंतर काही महिन्यांनी ठेवण्यात आला होता. मात्र, अपेक्षित बोलीच चार लाखांच्या पुढे ठेवण्यात आल्याने सहभागींनी लिलावात बोली न लावताच माघार घेतली. त्यामुळे हा लिलाव रद्द झाला. हा लिलाव आता पाच वर्षांतील लिलावात आलेल्या किमतीच्या सरासरीवर व बाजारभावाचा ताळमेळ घालून जी कमी किंमत आहे त्यावर लिलावाच्या बोलीची सुरुवातीची रक्कम ठेवण्यात येणार आहे. याशिवाय लाडू प्रसादाचा मुद्दाही या बैठकीत उपस्थित करण्यात आला होता. त्याकरिता नवीन निविदा प्रक्रियेस प्रारंभ करण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्पूर्वी निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आहे त्या ठेकेदारास दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. यावेळी अन्य कार्यालयीन विषयही बैठकीत झाले. यावेळी देवस्थान व्यवस्थापन समितीचे संचालक दादा परब, प्रमोद पाटील, राजेंद्र आण्णा देशमुख, भीमगौडा पाटील, संगीता खाडे, सचिव शुभांगी साठे, सहायक सचिव शिवाजी साळवी, आदी उपस्थित होते.