शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाई बसली झुल्यावरी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:22 IST

कोल्हापूर : भालदार-चोपदार, रोषणनाईक असा लवाजमा, सनई-चौघड्यांचा मंजूळ सूर... समोर सुरेख रांगोळीचा गालिचा आणि पानाफुलांनी सजलेल्या झोपाळ्यात निवांत बसून ...

कोल्हापूर : भालदार-चोपदार, रोषणनाईक असा लवाजमा, सनई-चौघड्यांचा मंजूळ सूर... समोर सुरेख रांगोळीचा गालिचा आणि पानाफुलांनी सजलेल्या झोपाळ्यात निवांत बसून वैशाखात झुला घेत असलेली आई अंबाबाई... अशा मंगलमयी वर्षातील साडेतीन मुुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय्यतृतीयेनिमित्त शुक्रवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची झोपाळ्यावरील मनोहारी पूजा बांधण्यात आली. कोरोनामुळे मंदिरात प्रवेश नसला तरी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे करण्यात आलेल्या थेट प्रक्षेपणामुळे घरात बसूनच भाविकांनी देवीसमोर हात जोडले.

उन्हाळ्याचे दिवस म्हणजे वैशाखवणवा. एकीकडे उन्हाने लाही-लाही होत असतानाच बहरलेली वनराई, आंब्याचा गोडवा हा निसर्गाचा साज अंबाबाईच्या चरणी अर्पण करण्यासाठी दरवर्षी अक्षय्यतृतीयेला गरुड मंडपात देवीची झोपाळ्यातील पूजा बांधली जाते. मूळ मूर्तीच्या दुपारच्या पूजेनंतर पानाफुलांनी सजलेला झोपाळा, चांदीचे आसन आणि भरजरी शालूत अलंकारांनी सजलेल्या अंबाबाईची उत्सवमूर्ती या झोपाळ्यात विराजमान होते. चोपदार, रोषणनाईक असा लवाजमा देवीचा झुला झुलवत तिच्याचरणी सेवा अर्पण करतात. यावेळी देवीची ओटी भरण्यात आली. त्यानंतर जिवाला थंडावा देणाऱ्या पन्ह्याचे वाटप करण्यात आले.

कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी भाविकांना अंबाबाईच्या या पूजेचा, प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ घेता आलेला नाही. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने फेसबुक, यूट्युब, इन्स्टाग्राम तसेच अंबाबाई लाईव्ह दर्शन ॲपच्या माध्यमातून या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. रात्री साडेआठ वाजता, देवीची आरती झाली, रात्री साडेनऊ वाजता पालखीने या सोहळ्याची सांगता झाली.

---

फोटो स्वतंत्र

--