शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाई शालूचा लिलाव पुन्हा गुंडाळला

By admin | Updated: April 9, 2016 00:59 IST

अपेक्षित किंमत नाही : पुन्हा प्रक्रिया होणार

कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई देवीस गतवर्षी नवरात्रोत्सवात तिरुपती बालाजी देवस्थानकडून शालू अर्पण करण्यात आला होता. या शालूचा अर्थात साडी प्रसादाचा लिलाव आज, शुक्रवारी गुढीपाडव्यादिवशी आयोजित केला होता. मात्र, अपेक्षित असणारी चार लाख २० हजारांहून अधिकची बोली न आल्याने हा लिलाव दुसऱ्यांदा तहकूब करण्यात आला. बालाजी देवस्थानने नवरात्रौत्सव २०१५ मध्ये हा शालू देवीस अर्पण केला होता. पहिल्या लिलावात अपेक्षित किंमत न आल्याने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने हा लिलाव रद्द केला. रद्द झालेला हा लिलाव नव्याने शुक्रवारी दुपारी १२ वाजता अंबाबाई देवी मंदिरातील देवस्थान व्यवस्थापन समितीच्या कार्यालयात घेण्यात आला. यावेळी देवस्थानचे सहसचिव शिवाजी साळवी यांनी चार लाख २० हजार ही सरकारी बोलीची रक्कम असून या किमतीच्या वर बोली लावण्यास सांगितले. मात्र, लिलावात सहभागी झालेल्यांनी काहीही प्रतिसाद न दिल्याने साळवी यांनी इच्छुकांना आपली बोली बोलण्यास सांगितले. त्यानुसार इचलकरंजीचे राम आडके यांनी २५ हजार रुपये इतकी सुरुवातीची बोली बोलली. त्यानंतर प्रदीपसिंह देसाई यांनी ३० हजार, त्यानंतर इचलकरंजीचेच सुभाष आमशे यांनी ५१ हजारची बोली लावली. काही काळ कोणीच बोली न लावल्याने पुन्हा समितीकडून बोली लावण्याचे आवाहन केले गेले. त्यानंतर राजेंद्र बुढ्ढे यांनी ५५ हजारांची बोली लावली. पुन्हा त्यानंतर प्रदीपसिंह देसाई यांनी ६५ हजार, तर आमशे यांनी ७० हजार आणि शेवटची बोली बुढ्ढे यांनी ७२ हजार इतकी लावली. या लिलावाच्या शेवटच्या बोलीनंतर लिलावाची प्रक्रियाच थांबविण्यात आली. कारण देवस्थान समितीला लिलावाच्या सरासरीवर आधारित असणारी चार लाख २० हजार ही किंमत न आल्याने दुसऱ्यांदा हा लिलाव रद्द करण्यात आला. पाच वर्षांच्या शालू लिलावाच्या सरासरीवर आजच्या लिलावाची किंमत चार लाख २० इतकी ठरविण्यात आली होती. तरी याहीवेळी अपेक्षित किंमत न आल्याने आम्ही हा लिलाव तहकूब करीत आहोत. - शुभांगी साठे, सचिव, प. म. देवस्थान समिती, कोल्हापूर देवस्थान समितीने लिलावाची किंमत आदीच ठरविल्याने याहीवेळी लिलावात अपेक्षित किंमत आली नाही. मागील वेळीही अव्वाच्या सव्वा किंमत अपेक्षित केली. इतकी किंमत सामान्य माणूस देऊ शकत नाही. -राम उषाण्णा आडके, सहभागी, इचलकरंजी लिलावाची रक्कम चार लाख २० हजार असतानीही सहसचिवांनी तुम्हाला वाटते तितक्या रकमेची बोली बोलण्यास का सांगितले. आम्ही २५ हजार ते ७२ हजारापर्यंत आमच्या ऐपतीप्रमाणे बोली बोलली. -प्रदीपसिंह देसाई, कोल्हापूर, सहभागी