शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी नेहमीच रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 01:14 IST

इचलकरंजी : मी साखर कारखानदारांसोबत जाऊन निवडणूक लढवत असल्याची माझ्यावर टीका केली जात आहे. मात्र, शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज ...

इचलकरंजी : मी साखर कारखानदारांसोबत जाऊन निवडणूक लढवत असल्याची माझ्यावर टीका केली जात आहे. मात्र, शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही. शेतकºयांचा कोणताही प्रश्न निर्माण झाला, तर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल. मग त्यावेळी सरकार कोणाचेही असो, असा विश्वास व्यक्त करून खासदार राजू शेट्टी यांनी इचलकरंजीच्या पाणीप्रश्नावर मीच तोडगा काढणार, असे सांगून मतदारांना भावनिक आवाहन केले.येथील विक्रमनगरातील बालाजी चौकात प्रचाराच्या सांगता सभेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.शेट्टी म्हणाले, वारणा काठावरील शेतकºयांना पाणी कमी पडू न देता इचलकरंजीला पाणी कसे द्यायचे, या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे आहे; पण त्यात राजकारण घुसले असल्याने हा प्रश्न विधानसभा निवडणूक होईपर्यंत सुटू दिला जाणार नाही, तरीही इचलकरंजीकरांना मीच पाणी मिळवून देणार आणि त्याबरोबर वस्त्रोद्योगासाठीही सर्वांना एकत्र करून लढा उभारणार. त्यातून यश मिळवून देऊन वस्त्रोद्योगाला बळ देणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाआघाडीतील सर्व घटक पक्षांना शेवटच्या टप्प्यावर एकत्रित करून निवडणुकीला सामोरे गेलो. त्यामध्ये सर्वांनी दिलेली साथ अमूल्य आहे.माजी मंत्री जयंत पाटील यांनी, करकरेंसारख्या शहीद होणाºया अधिकाºयांविषयी अपशब्द काढणाºया प्रज्ञा सिंहला भाजपने उमेदवारी दिली व मोदी त्यांची पाठराखण करतात. त्यावरूनच मोदी सरकारची दिशा समजते. मोदी शेतकºयांच्या प्रश्नांवर बोलत नाहीत. मात्र, पुलवामा हल्ल्याच्या नावावर मते मागतात. २०१४ नंतर पठाणकोट, उरी व पुलवामा असे तीन मोठे हल्ले झाले. त्याची नैतिक जबाबदारी समजून एकानेही राजीनामा दिला नाही. त्यातून त्यांचे खुर्चीप्रेम दिसते. भाजपचे लोक व्यक्तिगत टीका करताना दिसतात. त्यांच्याकडे प्रचारासाठी मुद्देच नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.माजी मंत्री प्रकाश आवाडे, दलित महासंघाचे अध्यक्ष मच्छिंद्र सकटे, शेतकरी समन्वय संघटनेचे व्ही. एम. सिंग, गणपतराव पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, आदींची भाषणे झाली. सभेसाठी मदन कारंडे, राजूबाबा आवळे, दिलीप पाटील, अशोक जांभळे, संभाजीराव नाईक, आदींसह घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.वस्त्रोद्योगाचे नुकसानमोदी सरकारच्या नोटाबंदी व जीएसटी या फसलेल्या निर्णयांमुळे इचलकरंजीचा वस्त्रोद्योग मोडकळीस आला. त्यांची चुकीची धोरणे सर्वच उद्योगांना उद्ध्वस्त करत आहेत. त्याची जबाबदारी मात्र घेताना त्यांच्यातील कोणीही दिसत नाही.पदयात्रा व सभेला उत्स्फूर्त गर्दीइचलकरंजीतील घोरपडे नाट्यगृहापासून निघालेली पदयात्रा मुख्य मार्गांवरून के. एल. मलाबादे चौकात आली. तेथे शेतकºयांनी आसूडाचा आवाज काढत तसेच हलगीच्या तालावर ठेका धरत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. त्यानंतर मुख्य मार्गांवरून फिरून पदयात्रा विक्रमनगरात पोहोचली. तेथे सभेलाही मोठी गर्दी जमली होती.उद्धव मोदींबरोबर कसे?निवडणुकांपूर्वी मोदींवर आगपाखड करणारे उद्धव ठाकरे कोणत्या कारणाने मोदींबरोबर गेले, याचे उत्तर आजतागायत कोणाला समजले नाही.माती, शेतीला जात नसतेमाझ्यावर जातीयवादी असल्याची टीका सुरू आहे. दुसरा मुद्दा नसल्याने विरोधकांचे हे काम सुरू आहे. माती व शेतीला जात नसते. त्यामुळे जात बघून मत देण्यापेक्षा काम बघून मत द्या, असे आवाहन शेट्टी यांनी केले.