शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

सदैव राहो लक्ष्मीचा वास...

By admin | Updated: October 23, 2014 23:06 IST

थाटामाटात आज, गुरुवारी घरोघरी लक्ष्मी-कुबेर पूजन

कोल्हापूर : या रक्ताम्बुजवासियी विलासिनीचंडांशु तेजस्विनीया रक्तारूधिराम्बरा हरीसखी,या श्री मनोल्हासिनीया रत्नाकर मंथन प्रगटिता,विष्णू स्वया गेहिनीसा मां पातू मनोरमा,भगवती लक्ष्मीच पद्मावती..चौरंगावर सुपारीरूपी गणपती, सरस्वतीचे प्रतीक असलेली लेखणी, घरातली अलक्ष्मी घालवून लक्ष्मीच्या आगमनासाठीची स्वच्छता जपणारी केरसुणी, दिव्यांची आरास, रांगोळीची सजावट, आंब्याची पाने, झेंडूच्या फुलांच्या माळा, कलशावर लक्ष्मीची, तसेच धनाचा अधिपती कुबेराच्या प्रतिमेची स्थापना, मंत्रोच्चार, आरती, धुपदीप, पक्वानांचा नैवेद्य..अशा थाटामाटात आज, गुरुवारी घरोघरी लक्ष्मी-कुबेर पूजन करण्यात आले. दिवाळी उत्सवातला महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. धन, धान्य, समृद्धीची अधिष्ठाता असलेल्या लक्ष्मीच्या कृपेने आपल्या कुटुंबात सदैव सुख नांदावे, तिचा वास आपल्या घरात राहावा, या श्रद्धेय मनोभावनेतून लक्ष्मी-कुबेराचे पूजन यादिवशी केले जाते. आज संध्याकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते आठ वाजून ३९ मिनिटांपर्यंत लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त होता. देवीच्या आगमनासाठी संध्याकाळी दारात सुरेख रांगोळीचा गालिचा काढण्यात आला. आकाशकंदिलांचा झगमगाट आणि पणत्यांच्या मंदज्योतीने जणू तिची ओवाळणी केली. घरात चौरंगावर लक्ष्मी-कुबेराची प्रतिमा, समोर कलश मांडण्यात आला. धण्याच्या राशीवर लक्ष्मीची मूर्ती, तर चौरंगावर शेजारी एका बाजूला गणपती, दुसऱ्या बाजूला सरस्वतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. चौरंगाभोवती रांगोळीची सजावट, दिव्यांची आरास करण्यात आली. पाच फळे, केळी, धूप, दीप, आरतीने देवीची शोड्षोपचारे पूजा केल्यानंतर चिरमुरे आणि बत्ताशांचा प्रसाद आणि गोडधोडाचे नैवेद्य दाखविले. रात्री उशिरापर्यंत फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. आप्तेष्ट, शेजाऱ्यांच्या गाठीभेटी, हळदी-कुंकवाने सुवासिनींनी लक्ष्मीपूजनाचा दिवस साजरा केला. घरातील लक्ष्मीपूजन झाल्यानंतर श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठीही मंदिरात भाविकांची झुंबड उडाली होती. (प्रतिनिधी)कार्यालये, व्यापारी, सराफ पेढींवर पूजा विविध कार्यालये, व्यावसायिक, दुकानदारांनीही संध्याकाळी लक्ष्मी, वहीपूजन केले. विशेषत: सराफांच्या पेढीवर विविध धार्मिक विधींनी ही पूजा झाली. झेंडूच्या माळा, विद्युत माळा, पणत्या आणि फटाक्यांच्या आतषबाजीने संध्याकाळी गुजरी परिसर उजळून निघाला. लक्ष्मीपूजन तर दुसरीकडे ग्राहकांना सेवा, असे वातावरण होते. दुकानांमध्ये या खास पूजनाला सर्व कुटुंबीय उपस्थित होते. त्यानंतर सर्वांनी फटाक्यांची आतषबाजी केली.