शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

‘अल्युकेम’ छापा संशयाच्या भोवऱ्यात

By admin | Updated: April 24, 2015 01:36 IST

लोकप्रतिनिधींचेही मौन : एक महिन्यानंतर छाप्याची माहिती उघड

गारगोटी : शेळोली येथील कारखान्यावर प्रांत विभागाने १६ मार्च २०१५ला छापा टाकला. तब्बल एक महिना सहा दिवस हा छापा गोपनीय का ठेवण्यात आला? याची माहिती प्रसारमाध्यमांपासून लपविण्यामागे प्रांताधिकाऱ्यांचा नेमका हेतू कोणता? यात नेमका कोणता ‘अर्थ’ दडला आहे? शेळोली येथील ‘अल्युकेम’ या बेकायदेशीर कारखान्यावर भुदरगड-आजऱ्याच्या प्रातांधिकारी यांनी मार्च महिन्यात १६ तारखेला छापा टाकला. या छाप्यात सर्व गैरकारभार त्यांच्या निदर्शनास आला; पण त्यांनी याबाबत प्रतिनिधींना कोणतीही कल्पना दिली नाही. त्यांची ही तपासणी कामाचा भाग असेल, त्यात काहीही गैर नसावे म्हणून सर्व ठिकाणी आलबेल असल्याचे पसरविले; पण मंगळवारी अचानक ठरावीक लोकांना हाताशी धरून ही प्रसिद्धी देण्यात नेमका कोणता हेतू होता, हे स्पष्ट होत नाही. या कारवाई व दिरंगाईमुळे प्रांत कार्यालयातील इतर कामांवर संशय व्यक्त होत आहे. सलग सात वर्षे हा कारखाना सुरू असताना तहसील कार्यालयास पाठीशी घालणाऱ्या प्रांत कार्यालयाचा हेतू कोणता? प्रांताधिकारी व तहसीलदार या कर्तबगार असताना असा बेकायदा कारखाना चालू राहतो कसा? गोपनीयता पाळत ही कारवाई तब्बल एक महिना दडविण्याने काय साध्य केले? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. दोन दिवस संपूर्ण तालुक्यात याचीच चर्चा होत आहे. प्रांताधिकारी व तहसीलदार हे लक्ष्य आहेत, तर लोकप्रतिनिधी यावर आवाज उठविणार की त्यांचाही आवाज दबला जाणार? सामान्य शेतकरी, रस्त्यांवरील प्रवाशी, बहूमुल्य अशा गौण खनिजांची लूट, तालुक्यातील नैसर्गिक संपत्तीची सर्वत्र राजरोस लूट होत असतानही दोन्ही कार्यालये केवळ दंडात्मक कारवाईवर समाधान मानत आहेत. वाळू व माती माफियांवर कारवाईसुद्धा ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर त्याची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेऊन तहसील विभागास कारवाईसाठी आदेश दिले. त्यानंतर या कार्यालयाने सोयीने कारवाई करूनसुद्धा अकरा लाख रुपये दंड वसूल झाला. म्हणजे ही कार्यालये बातमी प्रसिद्ध झाल्याखेरीज कारवाई करीत नाहीत का? या कारवाईवरील पडदा हळूहळू सरकत असून, एक-एक धक्कादायक गोष्टी बाहेर येणार आहेत. एक महिन्याच्या छाप्यानंतरही तपासणी नाही, ठोस कारवाई नाही. याबाबत प्रांताधिकारी कीर्ती नलवडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)