शिरोळ : शिरोळ तालुक्यातील बाजारपेठामधील व्यापार सुरू करण्यास तातडीने परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने तहसीलदारांना देण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना चाचणी तपासणीचा पॉझिटिव्ह अहवालाचा दर १२ टक्के आहे. यापैकी जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठा असणाऱ्या शिरोळ तालुक्यातील कोरोना तपासणीचा पॉझिटिव्ह अहवालाचा दर सात ते आठ टक्केपर्यंत खाली आला आहे.
शासनाच्या निकषानुसार या शहरातील बाजारपेठा सुरू करण्यास परवानगी देणे गरजेचे आहे. सध्या तालुक्यात बाजारपेठा बंद असल्याने व्यापारी, कामगार व नागरिकांना याचा फटका बसत आहे. त्यामुळे दैनंदिन रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनला आहे. शासनाकडून विवाह, शाळा, महाविद्यालय, विविध निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार व्यापाऱ्यांनाही मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून व्यापार सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली.
यावेळी पं.स. सदस्य सचिन शिंदे, शैलेश चौगुले, सागर संभूशेटे, दादासो पाटील, बी.जी. माने, प्रकाश गावडे, पियूष शहा, शशिकांत खिचडे, संदीप पाटील, किरण काडगे, राजेश झंवर, बाहुबली मगदूम, अजित पाटील, सतीश कोळेकर, किरण पाटील, बंडू पाटील यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.
फोटो - १२०७२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ - शिरोळ येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने तहसील कार्यालयास निवेदन देण्यात आले.