शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

जनता बझारच्या सभेत आरोप-प्रत्यारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:26 IST

कोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार जनता सेंट्रल को-ऑप. कंझ्यु. स्टोअर्स (जनता बझार) ची ५८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी ...

कोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार जनता सेंट्रल को-ऑप. कंझ्यु. स्टोअर्स (जनता बझार) ची ५८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी सत्तारूढ व विरोधकांत आरोप-प्रत्यारोप करण्यात आले.

संस्थेचे अध्यक्ष मदन चोडणकर यांनी संस्थेच्या कारभाराचा आढावा घेतला. निवडणुकीवेळी संस्थेच्या खात्यात पाच हजार रुपये शिल्लक हाेते, आता दहा लाख रुपये शिल्लक असल्याचे चोडणकर यांनी सांगितले. कोरोना काळात रेशन दुकानदारांना विमा संरक्षण दिल्याचे संचालक रमेश उलपे यांनी सांगितले. संस्थेचे उपाध्यक्ष आकाराम पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

ज्येष्ठ संचालक अरुण साळोखे, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, शिवाजी घाटगे, अरविंद खेडकर, उदय देसाई, दीपक शिराळे, विद्या माळी, ललिता माळी, निकीता पाटील, आदी उपस्थित होते.

जनता बझारची सभा गुंडाळली - विरोधकांचा आरोप

कोल्हापूर : जनता बझारच्या सभेत सत्ताधारी मंडळींनी कोणत्याही प्रश्नांची उत्तरे न देता सभा गुंडाळल्याचा आरोप विरोधी संचालक डॉ. सुहास बोंद्रे, रविकिरण चौगुले, वैभव पवार, तानाजी साजणीकर, मधुकर शिंदे, तृप्ती शिंदे यांनी पत्रकातून केला. सभेचा अहवाल का पाठविला नाही, याबाबत विचारणा केली असता, संचालकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. संस्थेत केलेला गैरकारभार झाकण्यासाठीच सत्तारूढ गटाने सभा गुंडाळल्याचा आरोप बोंद्रे यांनी केला.

फोटो ओळी : जनता बझारची ५८ वी वार्षिक सर्वसाधारण सोमवारी झाली, यामध्ये अध्यक्ष मदन चोडणकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अरुण साळोखे, रमेश उलपे, आकाराम पाटील, सचिन चव्हाण, आदी उपस्थित होते. (फोटो-१५०२२०२१-कोल- जनता बझार)