शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

माऊलीसह सहाही आरोपींच्या पोलीसकोठडीत वाढ

By admin | Updated: May 15, 2015 23:32 IST

माऊलीचा एक जवळचा सेवेकरी प्रकाश बाईत तिला सोडून गेला. प्रकाशला अद्दल घडावी, तो आपल्याकडे यावा, यासाठी माऊलीने ७ वर्षीय मुलाचे शिक्षक मधुकर चिंदकेच्या सहाय्याने अपहरण केले.

चिपळूण : आपल्या भोंदुगिरीने भक्तगण वाढवण्यासाठी एका बालकाचे अपहरण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या माऊली वासंती कांबळीसह इतर ५ आरोपींना न्यायालयाने आज (शुक्रवारी) दि. १८पर्यंत पोलीसकोठडी वाढवली. चिपळूण शहराजवळील कापसाळ गावी वासंती वसंत कांबळी या हॉटेलमध्ये पोळ्या लाटणाऱ्या महिलेने कलावती आर्इंच्या नावाने कापसाळ-फणसवाडी येथे सिध्दकला मठाची स्थापना केली. या मठाच्या माध्यमातून दर गुरुवारी ती प्रश्नोत्तराचा कार्यक्रम घेत असे. अगदी मूल होण्यापासून ते कॅन्सरवर उपचार करण्यापर्यंत साऱ्या गोष्टी माऊली साध्य करत असत, अशी अनेक भक्तांची श्रध्दा होती. आपले भक्त वाढावेत, यासाठी माऊलीचे विविध फंडे सुरु होते. त्यासाठी तिने कामथे हुमणेवाडी येथील नदीत एका दगडावर आपले स्वत:चे पाऊल कोरुन घेऊन ते कलावती आर्इंचे असल्याचे भासवले. येथील नदी अडवून तेथे श्रीकृष्णाचे मंदिर बांधले.दिवसेंदिवस माऊलीची कीर्ती वाढवण्यासाठी आटापिटा सुरु असतानाच माऊलीचा एक जवळचा सेवेकरी प्रकाश बाईत तिला सोडून गेला. प्रकाशला अद्दल घडावी, तो पुन्हा आपल्याकडे यावा, यासाठी माऊलीने त्याच्या ७ वर्षीय मुलाचे माध्यमिक शिक्षक मधुकर चिंदके याच्या सहाय्याने अपहरण केले. या कटात प्राजक्ता ऊर्फ मंगला जावळे, सूरज दळवी, माऊलीची ब्ाहीण अर्चना वाजे व चिंदकेच्या बहिणीचा पती सूर्यकांत नलावडे यांनी तिला मदत केली. या सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना आजपर्यंत पोलीसकोठडी सुनावण्यात आली होती. आज पुन्हा या सहाही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १८ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.याप्रकरणी पोलीस तपास वेगाने सुरु आहे. प्रथमला घरातून उचलून नेताना प्राजक्ता जावळेला ज्यांनी पाहिले होते, अशा काही महिलांची चौकशी आता पोलिसांनी सुरू केली आहे. (प्रतिनिधी)काही भक्तांचे धाबे दणाणलेमाऊलीच्या अटकेनंतर कामथे ग्रामस्थांनी नदीपात्रातील मंदिरे काढून टाकण्याबाबत आवाज उठविला व भक्तगणांना येथे येण्यास मज्जाव केला. त्यामुळे कामथे येथील मंदिराकडे एकही भक्तगण फिरकत नाही. माऊलीच्या मठातील कार्यक्रमही बंद झाले आहेत. सुरुवातीला काही काळ भक्तांनी माऊलीच्या सुटकेसाठी जपजाप केले. परंतु, आता माऊलीचे भांडे फुटल्याने भोंदुगिरी उघड झाली. त्यामुळे मठाकडेही भक्तगण फिरकत नाही. काही जवळच्या भक्तांचे धाबे दणाणले आहेत.