शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
5
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
6
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
7
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
8
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
9
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
10
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
11
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
12
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
13
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
14
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
15
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
16
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
17
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
18
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
19
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा

‘दौलत’साठी सर्वतोपरी सहकार्य

By admin | Updated: June 10, 2016 00:25 IST

चंद्रकांतदादा पाटील : गोपाळरावांचा भाजपमध्ये प्रवेश; तुर्केवाडी येथे विकासपर्व मेळावा

चंदगड : तालुक्यातील शेतकऱ्यांची जननी म्हणजे दौलत कारखाना आहे. तो सुरू झालाच पाहिजे. कारखाना सुरू करण्यासाठी येणाऱ्या पार्टींना शासन स्तरावर सर्वतोपरी मदत करू. दौलत चालवायला घेणाऱ्या कंपनीला कर्ज भरण्यासाठी १० वर्षे मुदत देऊन कर्जावरील व्याजात सवलत देण्यात येईल, असे आश्वासन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील महादेवराव वांद्रे पॉलिटेक्निकमध्ये आयोजित विकासपर्व मेळाव्यात ते बोलत होते. तालुकाध्यक्ष नामदेव पाटील यांनी प्रास्ताविक करून विकासासाठी शासनाने निधी देऊन बॅकलॉग भरून काढावा, अशी मागणी केली. यावेळी गोपाळराव पाटील यांनी कार्यकर्त्यांसह भाजप पक्षात प्रवेश केला. त्यांचा मंत्री पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला. पाटील म्हणाले, राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार आहे. हे सरकार शेतकऱ्यांना सुरक्षितता देण्याबरोबरच सर्व गरिबांना मोफत घरे देऊन गरिबी हटविण्याचे काम करत आहे. ७० हजार शेतकऱ्यांना सोलर पंप वाटप केले. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत १ लाख कामे उपलब्ध केली, तर २४ टीएमसी पाणी अडविले. यासह त्यांनी राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. गोपाळराव यांना आमदार करायचे असेल तर येणाऱ्या पं. स. व जि. प. निवडणुकीत भाजपचे कमळ फुलवावे लागेल. त्यासाठी संघटनात्मक काम करावे.बेळगाव ग्रामीणचे आमदार संजय पाटील यांनी काँगे्रसला हटविल्याशिवाय देशातील गरिबी हटणार नाही. १८-१८ तास देशासाठी काम करणारे पंतप्रधान देशाचे भविष्य बदलणार आहेत. ६० वर्षे जसे काँगे्रसवर आंधळे प्रेम केले तसे यापुढे करू नका, असे सांगून भाजप जातीचा विकास नाही, तर व्यक्तीचा विकास करते.गोपाळराव पाटील म्हणाले, ‘दौलत’ सुरू करण्यासाठी मी जिवापाड प्रयत्न केले आहे. काही मंडळी जाणीवपूर्वक ‘दौलत’मध्ये अडथळा आणत आहेत. बीव्हीजी, कॅरी इंडिया या चांगल्या कंपन्यांनाही पळवून लावले. एव्हीएच घालवत व दौलत सुरू करतो म्हणून तालुक्यातील जनतेची दिशाभूल करून निवडणुका जिंकल्या. दौलत हा तालुक्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने राज्य व केंद्राने मदत करावी, अशी मागणी केली. यावेळी बाबा देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले. शिवाजी बुवा, सुरेश घाडगे, महादेव वांद्रे, महिला अध्यक्षा पाटील, शांता गावडे, शांताराम मुरकुटे, सरपंच लक्ष्मी कांबळे, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)