कोल्हापूर : माजी खासदार उदयसिंगराव गायकवाड यांच्या मृत्यूमुळे कोल्हापूरचे मोठे नुकसान झाले. राजकारणातील उथळ व भडकपणाला बगल देत, आयुष्यभर माणसे जोडलेला अनुभवी नेता हरपला, असे प्रतिपादन महापौर तृप्ती माळवी यांनी केले. महापालिकेत आज, गुरुवारी उदयसिंगराव गायकवाड यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित सर्वपक्षीय शोकसभेत त्या बोलत होत्या. महापालिकेच्या राजर्षी शाहू सभागृहात सर्वपक्षीय नेत्यांनी गायकवाड यांच्या आठवणींना उजाळा दिला. तत्पूर्वी महापौर माळवी यांच्या हस्ते गायकवाड यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. जिल्ह्यात कॉँग्रेस रुजविण्यात गायकवाड यांचा सिंहाचा वाटा आहे. शेती, कुस्ती, कला, क्रीडा, सहकार, आदी क्षेत्रांत गायकवाड यांनी वेगळा ठसा उमटविला, असे महापौर माळवी यांनी सांगितले. शेकाप व कॉँग्रेसच्या संघर्षाच्या काळात गायकवाड यांनी संयम दाखवीत एक-एक माणूस जोडत पक्षाची मुळे घट्ट रोवली, असे ‘शेकाप’चे भारत पाटील यांनी सांगितले. यावेळी लाला गायकवाड, अॅड. सुरेश कुराडे, आर. के. पोवार, उपमहापौर मोहन गोंजारे, सचिन चव्हाण, राजेश लाटकर, लीला धुमाळ, आदी उपस्थित होते.
उदयसिंगराव गायकवाड यांना पालिकेत सर्वपक्षीय श्रद्धांजली
By admin | Updated: December 5, 2014 00:23 IST