शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शहर हद्दवाढीसाठी सर्वपक्षीय एकवटले

By admin | Updated: June 19, 2016 01:09 IST

शासकीय समितीसमोर मांडली ठाम मते : महापालिकेच्या सुविधा पाहिजे तर हद्दवाढ का नको?

कोल्हापूर : शहराच्या हद्दवाढीसाठी आज, शनिवारी सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीच्या नेत्यांनी शासनाच्या समितीसमोर पोटतिडकीने आपली मते मांडली. ही मते मांडताना त्यांनी शहराचा विकास होण्यासाठी प्रस्तावित हद्दवाढीच्या गावांना समाविष्ट करण्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट केले. महापालिकेच्या सुविधा घेता तर हद्दवाढ का नको, असा सवालही यावेळी करण्यात आला. त्याचवेळी या प्रश्नात राजकारण न करता शहराची बदनामी करू नये, असे आवाहनही यावेळी काही नेत्यांनी केले. ग्रामीणचा बोजा शहरावरच प्रस्ताविक हद्दवाढीतील गावे ही शहरावर अवलंबून आहेत. ग्रामीण जनता महापालिका, सरकारी व खासगी दवाखान्यांतून मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घेत आहे. दररोज खरेदी-विक्रीच्या निमित्ताने, नोकरी, उद्योग, व्यवसायांच्या निमित्ताने लाखो लोक दररोज शहरातील वाहतुकीच्या सुविधेचा लाभ घेतात. महानगरपालिकेच्या मार्केटचा वापर करतात. नजीकच्या गावातून येणारे सुमारे ५० हजारांहून अधिक विद्यार्थी शहरातील शाळेतून शिक्षण घेत आहेत. त्यांना केएमटी बससेवा सवलतीच्या दरात दिली जाते. या सर्व गोष्टींचा बोजा शहरावर पडतो. ग्रामीण जनतेचा कचरा, सांडपाणी उपसा करण्याची वेळ महापालिकेवर येते. आत्ताच या गावांना इतक्या सुविधा महानगरपालिकेमार्फत दिल्या जात आहेत, म्हणूनच ही गावे शहरात समाविष्ट केली पाहिजेत, अशी भूमिका नगरसेवक जयंत पाटील यांनी मांडली. ज्यांचे राजकारण ग्रामपंचायतीवर अवलंबून आहे, असे मूठभर लोक याला विरोध करीत आहेत. जर हद्दवाढ करायची नसेल तर शासनाने महापालिकेचे रूपांतर नगरपालिकेत करावे, असेही प्रा. पाटील म्हणाले. बैठकीच्या सुरुवातीस कोल्हापूर शहर सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार यांनी प्रास्ताविक केले. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश मोरे, लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, नगरसेविका अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर, लाला गायकवाड, सुरेश जरग, ‘प्रजासत्ताक’चे दिलीप देसाई, यांनीही मते मांडली.