शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

‘सर्किट बेंच’साठी सर्व प्रयत्न करणार

By admin | Updated: May 4, 2016 00:09 IST

प्रकाश मोरे : जिल्हा बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची ‘लोकमत’ला सदिच्छा भेट

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे ‘सर्किट बेंच’ कोल्हापुरात स्थापन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी राज्य शासन व न्याय व्यवस्थेकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती जिल्हा बार असोसिएशनचे नूतन अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. जिल्हा बार असोसिएशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी ‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सत्कार ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी केला. यावेळी ‘सर्किट बेंच’च्या लढ्यासंदर्भात बोलताना मोरे म्हणाले, गेली ३० वर्षे कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सोलापूर या सहा जिल्ह्णांतील वकिलांच्या संघटना मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन होण्यासाठी लढत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती धीरेंद्र वाघेला यांची भेट घेऊन यासंबंधी पाठपुरावा केला जाणार आहे. याप्रसंगी उपाध्यक्ष अ‍ॅड. अरुण पाटील, सचिव सर्जेराव खोत, खजानिस प्रशांत पाटील, सदस्य गुरू हारगे, यतिन कापडिया, शहाजी पाटील, मेघा पाटील, अनुजा देशमुख, मनोहर पोवार, धैर्यशील पोवार, संदीप चौगुले, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) शेंडा पार्कातील जागेची मागणी करणारराज्य शासनाने कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन करण्यासाठी ११०० कोटींच्या निधीची तरतूद केल्याचे यापूर्वी जाहीर केले आहे, पण हा निधी कोणत्या तरतुदीखाली जाहीर केला आहे, याचा पाठपुरावा करणार आहे. सायबर कॉलेजच्या पिछाडीस असलेली नऊ एकर जागा ‘सर्किट बेंच’च्या न्यायाधीशांच्या निवासस्थानासाठी राखीव ठेवण्यात आली. त्यामुळे ‘सर्किट बेंच’साठी शेंडा पार्क येथील शासकीय जागेची मागणी करणार आहे. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी ‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी डावीकडून कार्यकारिणी सदस्य गुरू हारगे, खजानिस प्रशांत पाटील, यतिन कापडिया, सचिव सर्जेराव खोत, अध्यक्ष प्रकाश मोरे, उपाध्यक्ष अरुण पाटील, शहाजी पाटील, मेघा पाटील, अनुजा देशमुख, मनोहर पोवार, धैर्यशील पोवार, संदीप चौगुले, आदी मान्यवर उपस्थित होते.