शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभर गाठीभेटी, जोडण्यांचा रविवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 01:03 IST

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचा प्रचार मध्यावर आला असून, विविध गटांनी भूमिका जाहीर केल्याने प्रचाराला चांगलीच रंगत आली आहे. रविवारी ...

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचा प्रचार मध्यावर आला असून, विविध गटांनी भूमिका जाहीर केल्याने प्रचाराला चांगलीच रंगत आली आहे. रविवारी उमेदवारांसह प्रमुख कार्यकर्ते दिवसभर मतदारसंघात गाठीभेटी, तर सायंकाळी जाहीर सभा घेत आहेत. मतदान २३ एप्रिलला होत आहे, तत्पूर्वी आणखी दोन रविवार मिळणार असले तरी सुट्टीचा फायदा उठवीत सर्वच उमेदवारांनी प्रचारयंत्रणा सक्रिय केली. महाडिक यांनी करवीर, प्रा. मंडलिक यांनी शहरात, राजू शेट्टी यांनी पन्हाळ्यात, तर धैर्यशील माने यांनी शाहूवाडीत दिवसभर तळ ठोकला.कोल्हापुरात शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक व राष्टÑवादी आघाडीचे धनंजय महाडिक, तर हातकणंगलेत शिवसेनेचे धैर्यशील माने व आघाडीचे राजू शेट्टी यांच्यात सरळ लढत होत आहे. युती व आघाडीच्या प्रचारास सुरुवात होऊन महिना झाला असला तरी अंतर्गत रूसव्या-फुगव्यात बराच कालावधी गेला. शिवसेना-भाजप लवकर एकसंधपणे प्रचारात उतरल्याने सध्यातरी प्रचारात त्यांची आघाडी दिसते. धनंजय महाडिक यांनी स्वत:च्या यंत्रणेने दोन महिन्यांपासून मतदारसंघात राबता ठेवला आहे; पण राष्टÑवादी व कॉँग्रेस अंतर्गत नाराजी दूर करण्यात त्यांना ताकद खर्च करावी लागली. आता दोन्ही कॉँग्रेसचे कार्यकर्ते प्रचारात सक्रिय झाले आहेत. प्रत्येकाची प्रचाराची यंत्रणा प्रभावीपणे राबविण्याचे काम सुरू आहे. सुट्टीदिवशी बहुतांशी मतदार घरी भेटत असल्याने हा दिवस उमेदवारांच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो; त्यामुळे रविवार हा प्रचारासाठी महत्त्वाचा मानला जातो. मतदानासाठी अजून १६ दिवस आहेत, तोपर्यंत अजून दोन रविवार प्रचारासाठी मिळणार आहेत. तरीही मिळालेल्या रविवारचा फायदा करण्यासाठी उमेदवारांनी सकाळपासूनच नियोजन केले होते. ते यशस्वी केले.मंडलिक यांची शहरात पदयात्राप्रा. संजय मंडलिक यांनी रविवार सुट्टी म्हणून अखंड दिवस कोल्हापूर शहरात घालविला. सकाळी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासमवेत रंकाळा टॉवर, गंगावेश परिसरात पदयात्रा काढली. त्यानंतर शिवाजी पार्क, रुईकर कॉलनी येथे पदयात्रा काढत गाठीभेटी घेतल्या.दुपारी चार वाजता शिवाजी पेठेत बैठक, सायंकाळी सहा वाजता संभाजीनगर येथे भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष नीता केळकर यांच्या महिला मेळाव्यास उपस्थित राहिले. बजाप माजगावकर तालीम व उमा टॉकीज परिसरात कॉर्नर सभा घेतल्या.माने यांनी दिवसघालविला शाहूवाडीतधैर्यशील माने यांनी सकाळी बांबवडेपासून प्रचारास सुरुवात केली. व्यक्तिगत गाठीभेटी घेत मतदारांशी संपर्क मोहीम राबविली. आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांच्या समवेत नांदगाव, घुंगूर, खोतवाडी, पिशवी परिसरात त्यांनी बैठका घेतल्या. सायंकाळी शित्तूरपैकी मलकापूर येथे सभा घेतली.महाडिक यांची मिसळ पे चर्चाधनंजय महाडिक यांनी सकाळी कोल्हापूर शहरात तीन ठिकाणी मिसळ पे चर्चा करून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यानंतर दुपारी १२ वाजता ‘गोकुळ’चे संचालक अरुण नरके यांच्या कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थित राहिले. तेथून त्यांनी कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्यासमवेत सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघातील गावांत गाठीभेटी घेऊन मतदारांशी संवाद साधला. सायंकाळी सहा वाजता युवक मेळाव्यास ते उपस्थित राहिले.शेट्टी यांनी घेतला अंदाज : राजू शेट्टी यांनी सकाळी आठपासून दुपारपर्यंत पन्हाळा तालुक्यातील वारणानगर, कोडोलीसह परिसरात तळ ठोकला होता. त्यांनी तिथे विविध पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून अंदाज घेतला. दुपारी तीननंतर त्यांनी वडगाव, इचलकरंजीत गाठीभेटी घेतल्या. सायंकाळी हुपरी येथे सभा घेतली.