शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ मद्यपी डॉक्टरला अटक

By admin | Updated: February 26, 2016 01:21 IST

सीपीआरमध्ये विनयभंग : लैंगिक छळ निवारण समिती अहवाल देणार

कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील नवजात शिशू विभागातील विश्रांती कक्षात झोपलेल्या विवाहित महिला डॉक्टरचा (रा. मूळ नागपूर) विनयभंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पंकज हरिश्चंद्र पाटील (वय २४, रा. कळंबोली, ठाणे) या प्रशिक्षणार्थी डॉक्टरला गुरुवारी लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशू विभागात विश्रांती कक्षामध्ये झोपलेल्या विवाहित महिला डॉक्टरचा बुधवारी (दि. २४) पहाटे संशयित डॉक्टर पाटील याने मद्यधुंद व अवस्थेत विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिला डॉक्टरच्या पतीने त्याची धुलाई केली. त्यानंतर लक्ष्मीपुरी पोलिसांत त्याच्या विरोधात फिर्याद दिली. कारवाईच्या भीतीने डॉ. पाटील हा वसतिगृहातून फरार झाला. त्याने मोबाईलही बंद ठेवला. पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्याला पोलीस ठाण्यात हजर होण्यास सांगितले. गुरुवारी तो हजर होणार होता. पोलिसांनी त्याची दिवसभर वाट पाहिली, परंतु तो हजर राहिला नाही. तो एका मित्राच्या आश्रयाला गेला असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी त्या मित्राचे नाव, पत्ता व मोबाईल नंबर शोधून त्याला पोलिसी खाक्या दाखविताच रात्री आठच्या सुमारास डॉ. पाटील स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला. रात्री उशिरापर्यंत त्याच्याकडे चौकशी सुरू होती. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी या घटनेची दोन स्तरांवर चौकशी सुरू केली आहे. त्यात लैंगिक छळ निवारण समिती व बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर सरवदे यांचा समावेश होता. या दोन्ही समितींना तत्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. याप्रकरणी दिवसभर या समिती शिष्टमंडळाने चौकशी केली. दरम्यान, याप्रकरणी लैंगिक छळ निवारण समिती आज, शुक्रवारी अहवाल सादर करण्याची शक्यता आहे. समितीची बैठक गुरुवारी सकाळी दहा वाजता मायक्रो लॅबॉरेटरी विभागात झाली. समितीच्या अध्यक्षा डॉ. वनिता कुलकर्णी, सदस्या डॉ. रंजना जोशी, डॉ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. संगीता कुंभोजकर, डॉ. ज्योत्सना देशमुख, दिप्ती नाटेकर, प्रियदर्शनी चोरगे आदी उपस्थित होत्या. अध्यक्षांनी पीडिता, परिचारिका, सुरक्षा रक्षक व काही रुग्णांचे जबाब घेतले. ही चौकशी सुरूच होती.