शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

दारू वाहतूक ; एक ताब्यात

By admin | Updated: February 17, 2017 23:42 IST

हातकणंगलेमधील युवक : इन्सुलीत कारवाई, ५७ हजारांच्या दारूसह टेम्पो जप्त

बांदा : गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने छोट्या टेम्पोमधून होणाऱ्या बेकायदा गोवा बनावटीच्या दारु वाहतुकीविरोधात बांदा पोलिसांनी थरारक पाठलाग करत इन्सुली खांबदेव नाका येथे कारवाई करत ५७ हजार ८0 रुपये किंमतीच्या दारुसह ५ लाख ५७ हजार ८0 रुपये किंमतीचा मुद्येमाल जप्त केला. याप्रकरणी चालक नितिन ज्ञानदेव वासुदेव (२५, रा. भेंडवडे, ता. हातकणंगले, कोल्हापूर) याच्यावर अटकेची कारवाई केली.दरम्यान, २१ ला होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपासणी नाक्यावर कडक यंत्रणा राबविण्यास सुरूवात केली आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री उशीरा करण्यात आली. बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गीते आपले सहकारी हवालदार यमणप्पा वडर, दत्ता देसाई, उदयसिंह खांडेकर यांच्यासह मुंबई-गोवा महामार्गावर सटमटवाडी येथे गोव्यातून येणाऱ्या वाहनांची तपासणी करीत होते. त्याचवेळी गोव्याहूून बांद्याच्या दिशेने येणारा टेम्पो (एमएच 0९ सीयु ६९६५) चालकाला थांबण्याचा इशारा करण्यात आला. मात्र, चालकाने गाडी न थांबविता तेथून सुसाट वेगात इन्सुलीच्या दिशेने पलायन केले. पोलिसांनी या गाडीचा पाठलाग सुरु केला. बांदा तपासणी नाक्यावर गाडीला थांबविण्याचा इशारा करण्यात आला असता तेथूनही चालकाने पलायन केले.बांदा पोलिसांनी अखेर इन्सुली खांबदेव नाक्यापर्यंत पाठलाग करत चालकाला ताब्यात घेतले. गाडीच्या पाठीमागील हौद्यात गोवा बनावटीच्या विविध ब्रॅण्डची दारु बेकायदा आढळली. पोलिसांनी ५७ हजार ८0 रुपयांची दारु व पाच लाख रुपये किंमतीची गाडी जप्त केली. अधिक तपास बांदा पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)