कोल्हापूर : बांदा ते पात्रादेवी (जि. सिंधुदुर्ग) मार्गावरून बेकायदेशीर गोवा बनावटीची दारूची तस्करी करणारी मोटारकार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर भरारी पथकाने पकडली. या कारवाईत प्रथमेश प्रभाकर राऊळ (वय २६, रा. कुडाळ) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ९९० दारूच्या बाटल्या व मोटार असा सुमारे २ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई निरीक्षक पी. आर. पाटील, आर. जी. यवलुजे, कुमार कोळी, कॉन्स्टेबल सुशांत बनसोडे, विलास पवार आदींनी केली.
फोटो नं. १५०९२०२१-कोल-एक्साईज
ओळ : बादा ते पात्रादेवी (सिंधुदुर्ग) मागार्वर बेकायदेशीर गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारी मोटार कार पकडून तरुणास ताब्यात घेतले.
150921\15kol_9_15092021_5.jpg
ओळ : बादा ते पात्रादेवी (सिंधुदुर्ग) मागार्वर बेकायदेशीर गोवा बनावटीच्या दारुची तस्करी करणारी मोटार कार पकडून तरुणास ताब्यात घेतले.