शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

कळंबा तलावावर मद्यपींचा उच्छाद

By admin | Updated: January 2, 2017 00:14 IST

३१ डिसेंबरची नशा : सिमेंट बाकडी, ट्री गार्डची तोडफोड, नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया

कळंबा : नववर्षाचे स्वागत आणि ३१ डिसेंबरचा जल्लोष साजरा करण्याच्या बहाण्याने आलेल्या मद्यपी टोळीने शनिवारी मध्यरात्री कळंबा तलाव परिसरात तोडफोड करीत नुकसान केले. तसेच रिकाम्या दारूच्या बाटल्या फोडत धिंगाणा घातला. मद्यपींच्या या धिंगाण्याचा नागरिकांनी निषेध करत कारवाईची मागणी केली आहे.कळंबा तलावातील सांडवा परिसरात दररोज फिरावयास येणाऱ्या नागरिकांना विरंगुळा मिळावा यासाठी लोकवर्गणीतून बसविण्यात आलेल्या १५ सिमेंटच्या बाकड्यांची तसेच तलाव परिसरात लावलेल्या दहा झाडांच्या ट्री गार्डची नासधूस करण्यात आली आहे.नववर्षाच्या स्वागतासाठी पार्ट्या करण्यासाठी ३१ डिसेंबरला तलाव परिसरात गर्दी होती. दारूच्या नशेत असणाऱ्या टोळक्याने हुल्लडबाजी करत सांडवा परिसरातील सिमेंटची बाकडी, ट्री गार्डचे नुकसान केले. प्रतिवर्षी मद्यपींकडून तलावाचे नुकसान होते. तलाव परिसरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिवसेना करवीर तालुकाप्रमुख विराज पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी परिसरात पोलिस बंदोबस्ताची मागणी केली होती, पण त्यांची प्रशासनाने फारशी दखल घेतली नाही. तलावाच्या प्रवेशद्वाराजवळ करवीर पोलिस स्टेशनचे पोलिस मदत केंद्र आहे. तरीही मद्यपींकडून कृत्य घडल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. (वार्ताहर)