शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

बनावट नोटाप्रकरणी आलासच्या तरुणास पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:18 IST

कोल्हापूर : बनावट नोटा निर्मिती व जवळ बाळगल्याप्रकरणी वळीवडे रेल्वे स्टेशनजवळ छापा टाकून अटक केलेल्या आरोपीस चौथे जिल्हा व ...

कोल्हापूर : बनावट नोटा निर्मिती व जवळ बाळगल्याप्रकरणी वळीवडे रेल्वे स्टेशनजवळ छापा टाकून अटक केलेल्या आरोपीस चौथे जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एम. कागलकर यांनी पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विश्वास अण्णाप्पा कोळी (वय २७, रा. आलास, ता. शिरोळ) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. दुसरा संशयित आरोपी जमीर अब्दुलकादर पटेल (वय ३२, रा. आलास) याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील पी. जे. जाधव यांनी काम पाहिले.

खटल्याची पार्श्वभूमी अशी : विश्वास कोळी व जमीर पटेल यांना गांधीनगरमध्ये वळीवडे रेल्वेस्टेशन स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने दि. १९ मार्च २०१८ रोजी रात्री छापा टाकून पकडले. त्यांच्याकडे १००, २०० व २००० रुपयांच्या बनावट नोटा आढळल्या. चौकशीत कोळी याने या सर्व बनावट नोटा आलास (ता. शिरोळ) येथे आपल्या राहत्या घरी कलर झेरॉक्स प्रिंटरवर छापल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात कलर झेरॉक्स प्रिंटर, कागदाची रिम, कात्री, बनावट नोटा असे साहित्य जप्त केले होते. गांधीनगर पोलीस ठाण्यात पोलीस हे. कॉ. विजय कारंडे यांनी फिर्याद दिली होती. तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पो.नि. तानाजी सावंत व तत्कालीन पो.नि. दिनकर मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.

सुनावणीत सहा. सरकारी वकिलांनी १६ साक्षीदार तपासले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, जप्त मुद्देमालाचा मुंबई व नाशिकहून आलेला तपासणी अहवाल, पंच तसेच तपासी अधिकाऱ्र्यांच्या साक्ष, सरकारी वकिलांचा युक्तिवाद महत्त्वपूर्ण ठरला. त्यानुसार विश्वास कोळी याला पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दुसरा आरोपी जमीर पटेल याची निर्दोष मुक्तता केली. याकामी सहा. उपनिरीक्षक एम. एम. नाईक, हे, कॉ. आनंदा शिंदे (गांधीनगर) किरण गावडे(एलसीबी) यांचे सहकार्य लाभले.

फोटो नं. २७०५२०२१-कोल-विश्वास कोळी (आरोपी कोर्ट)

===Photopath===

270521\27kol_1_27052021_5.jpg

===Caption===

फोटो नं. २७०५२०२१-कोल-विश्वास कोळी (आरोपी कोर्ट)