कोल्हापूर : आजरा अर्बन बॅंकेच्या इतर मागास आणि भटक्या विमुक्त गटाच्या दोन्ही जागा रचनेमध्ये रद्द झाल्या आहेत. त्यामुळे गत संचालक मंडळामध्ये कार्यरत असलेले आर. डी. पाटील आणि प्रा. मधुकर भारती यांना संधी देण्यात आलेली नाही.
गेली अनेक वर्षे आर. डी. पाटील हे आजरा अर्बन बॅंकेच्या संचालक मंडळात इतर मागास प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. काशिनाथ चराटी आणि माधवराव देशपांडे यांच्यापासून ते सक्रिय होते. मात्र, मल्टिस्टेटच्या नियमानुसार इतर मागास गटच रचनेमध्ये रद्द करण्यात आला आहे. तसेच भटक्या विमुक्तमधून आजरा महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक मधुकर भारती कार्यरत होते. हा गटही रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे या दोघांनाही परत संधी मिळू शकली नाही.