शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
4
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
5
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
6
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
7
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
8
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
9
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
10
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
11
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
12
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
13
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
14
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
15
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
16
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
17
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
18
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
19
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
20
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...

अजितदादांच्या एन्ट्रीने ‘कृष्णा’ची हवा गरम

By admin | Updated: November 24, 2014 23:04 IST

निवडणूक रंगणार : भाजपच्या नेत्यांना सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे वेध

अशोक पाटील- इस्लामपूर विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशानंतर कऱ्हाड, वाळवा आणि कडेगावमधील नेत्यांना सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. या तिन्ही तालुक्यांतील सहकारी संस्था काँग्रेस, राष्ट्रवादीने उभ्या केल्या आहेत. या संस्थांवर मोदी लाटेची सावली पडण्याआधी हे नेते सातारा, सांगली जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी सरसावले आहेत. माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गळीत हंगामाच्या निमित्ताने ‘कृष्णा’वर एन्ट्री करत प्रचाराचा नारळच फोडला.‘कृष्णा’च्या गत निवडणुकीत मोहिते-भोसले यांच्या मनोमीलनाने राजकीय गोळाबेरीज चुकली. त्यानंतर सुरेश भोसले व अतुल भोसले या पिता-पुत्रांनी कऱ्हाड दक्षिणमध्ये लक्ष केंद्रित केले. मात्र अतुल भोसले यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. त्याचे खापर डॉ. इंद्रजित मोहिते यांच्यावर फोडून भोसले गट ‘कृष्णा’च्या निवडणुकीच्या तयारीस लागला आहे. दुसरीकडे विद्यमान अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या पाठीशी असलेले विलासकाका पाटील-उंडाळकर यांनी सातारा जिल्हा बँक आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भोसले गटाशी साटेलोेटे करण्याचा डाव आखल्याची चर्चा आहे. रविवारी कारखान्याच्या गळीत हंगामास प्रमुख पाहुणे असतानाही ते अनुपस्थित राहिले. राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटीलही या कार्यक्रमाकडे फिरकले नाहीत. त्यामुळे उंडाळकर आणि आ. पाटील यांची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.गत गळीत हंगामावेळी अविनाश मोहिते यांनी प्रा. एन. डी. पाटील यांना आमंत्रित केले होते, तर यंदा अजित पवार यांना आमंत्रित करून आपल्या गटाची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ‘कृष्णा’च्या आगामी निवडणुकीची हवा तापू लागली आहे. डॉ. इंद्रजित मोहिते यांनी स्वत:चा गट सक्षम करण्यासाठी वैद्यकीय व्यवसायातील लक्ष कमी करण्याची भूमिका घेतल्याचे समजते. त्यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचा पाठिंबा असला तरी, ते कोणत्याही पक्षाचा आधार घेऊन निवडणूक लढविणार नसल्याचे सांगत आहेत.सध्या दक्षिण कऱ्हाड, कडेगाव आणि वाळवा तालुक्यातील नेत्यांनी ‘कृष्णा’च्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र कोण कोणाच्या बाजूने असेल, हे मात्र सातारा जिल्हा बँक व बाजार समितीच्या निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे.कृष्णा कारखान्याची आजची स्थिती बिकट आहे. नेत्यांना गळीत हंगामाला आणून प्रत्येकवर्षी डल्ला मारण्याचा उद्योग सत्ताधाऱ्यांनी चालवला आहे. वरिष्ठ नेत्यांनी कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीची चेष्टा चालविली असून आगामी काळात हा कारखाना खासगी करण्याचा डाव राष्ट्रवादीकडून आखला जात आहे.- डॉ. इंद्रजित मोहिते, माजी अध्यक्ष, कृष्णा कारखानागत निवडणुकीत आम्ही आणि मोहिते एकत्र होतो. आमच्या दोघांचे विरोधक विलासकाका उंडाळकर होते. मात्र विधानसभा निवडणुकीत डॉ. इंद्रजित मोहिते यांनी काँग्रेसला मदत करून आम्हाला दगा दिला. त्यामुळे आमचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. कारखान्याची निवडणूक लढविण्यास आम्हीही सक्रिय आहोत.- डॉ. सुरेश भोसले, माजी अध्यक्ष, कृष्णा कारखाना.