शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

सभापतिपदासाठी अजित पोवार अपात्र

By admin | Updated: January 2, 2015 00:39 IST

न्यायालयाचा आदेश : नाईकनवरे यांचा दावा; ‘परिवहन’ निवडणुकीला स्थगिती नसल्याने स्पष्टीकरण

कोल्हापूर : महापालिकेच्या परिवहन सभापतिपदासाठी उद्या, शुक्रवारी विशेष सभेत निवडणूक होत आहे. मात्र, कॉँग्रेस पक्षाचे सभापतिपदाचे उमेदवार अजित पोवार यांच्या अर्जावर सूचक असलेले शशिकांत पाटील हे स्वीकृत सदस्य असल्याने पोवार यांचा अर्ज अपात्र ठरत असल्याचा आदेश जिल्हा कनिष्ठ स्तर न्यायालयाने दिला असल्याची माहिती जनसुराज्य पक्षाचे बंडखोर उमेदवार प्रकाश नाईकनवरे यांनी आज, गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. पोवार यांचा अर्ज अवैध ठरल्यास नाईकनवरे यांची परिवहन सभापतिपदी बिनविरोध निवड होईल. नाईकनवरे व माजी नगरसेवक रमेश पुरेकर यांनी बंडखोरी अर्ज दाखल करताना म्हटल्याप्रमाणे ‘बिनआवाजाचा बॉम्ब’ फोडल्याने महापालिकेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.कॉँग्रेस, राष्ट्रवादी व जनसुराज्य पक्षांमध्ये ठरलेल्या सत्तासूत्रानुसार आता येणारे परिवहन सभापतिपद कॉँग्रेसच्या वाट्याला गेले. मात्र, पक्षाने गेली चार वर्षे डावलल्याने नाराज झालेल्या प्रकाश नाईकनवरे यांनी बंडाचे निशाण हाती घेतले; तर जनसुराज्यच्या मृदुला पुरेकर यांनी स्थायी समिती सभापतीची निवडणूक लढविण्याची तयारी केली. यामुळे हडबडलेल्या नेत्यांनी सदस्यांना ‘व्हिप’ बजावून अज्ञातस्थळी रवाना केले. मात्र, पुरेकर व नाईकनवरे यांनी अर्ज दाखल करताना सांगितल्याप्रमाणे आज बिनआवाजाचा बॉम्ब फोडला. माजी नगरसेवक रमेश पुरेकर, दत्ता टिपुगडे, प्रकाश मोहिते उपस्थित होते.माहिती देताना नाईकनवरे म्हणाले, शशिकांत पाटील हे स्वीकृत सदस्य आहेत. त्यामुळे पाटील यांना प्रत्यक्ष मतदानात सहभागी होता येत नाही, असे असतानाही पाटील हे पोवार यांच्या सभापतिपदासाठीच्या उमेदवारी अर्जावर सूचक आहेत. स्वीकृत सदस्याला मतदानाचा अधिकार नाही, तर सूचक कसे होता येईल? या मुद्द्याच्या आधारे ३१ डिसेंबरला न्यायालयात दाद मागितली. यानुसार पोवार यांना अपात्र ठरविण्याचे आदेश दिले. याबाबत म्हणणे आजच आयुक्त बिदरी यांच्यामार्फत नगरसचिव रणदिवे यांना सादर केले.दरम्यान, न्यायालयाने पोवार यांचा अर्ज अवैध ठरविताना, निवडणूक प्रक्रियेबाबत भाष्य केलेले नाही. उद्या सकाळी न्यायालयाच्या अधिकृत निकालाची प्रत प्रशासनाला पोहोच होईल. निवडणुकीसाठी स्थगिती नसल्याने उद्या, शुक्रवारी ठरल्याप्रमाणे निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागेल. पोवार यांचा अर्ज अवैध ठरल्याने सभापतिपदी बिनविरोध आपलीच वर्णी लागेल, असे नाईकनवरे यांनी स्पष्ट केले.