शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

कऱ्हाडनंतर अजित पवारांच्या दारात धरणे

By admin | Updated: June 21, 2014 01:00 IST

टोलविरोधी कृती समितीचा निर्णय : २६ जून रोजी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार

कोल्हापूर : राजर्षी शाहू जयंतीदिवशी २६ जूनला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या दारात कऱ्हाड येथे एक दिवसाचे लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गावात बारामतीला आंदोलन करण्यात येईल. याची तारीख नंतर जाहीर करू, असे सांगून २६ जूनला सकाळी नऊ वाजता कार्यकर्त्यांनी दसरा चौकात हजर राहण्याचे आवाहन टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी पत्रकार परिषदेत केले. मिरजकर तिकटी येथील विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात टोलविरोधी कृती समितीची बैठक झाली. कऱ्हाड येथे मुख्यमंत्र्यांच्या दारात करावयाच्या लाक्षणिक उपोषणाची तयारी करण्यात आली. वाहने, कार्यकर्त्यांची सोय, मार्ग, निघण्याची वेळ, आदींवर चर्चा झाली. गुरुवारी सकाळी नऊ वाजता दसरा चौक येथे जमण्याचे ठरले आहे. कोल्हापूर टोलमुक्त करण्याच्या उद्देशाने प्रत्येकाने वाहनासह हजर रहावे. कऱ्हाडपर्यंत जाणारी ही रॅली अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात येईल. कोल्हापूरच्या परंपरेला शोभेल अशी ही रॅली अन् आंदोलन असेल असे साळोखे यांनी स्पष्ट केले.आंदोलनात कोल्हापूर बार असोसिएशन, लॉरी असो. टेम्पो व आॅटो रिक्षा युनियन, खासगी बस असो. आदीसह सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. यावेळी बार असो.चे अध्यक्ष विवेक घाटगे, रामभाऊ चव्हाण, सतीशचंद्र कांबळे, गणी आजरेकर, बाबा इंदुलकर, जयकुमार शिंदे, दिलीप देसाई, किसन कल्याणकर, लाला गायकवाड, अशोकराव साळोखे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)