शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘अजिंक्यतारा’ गुलालात रंगला

By admin | Updated: November 3, 2015 00:23 IST

गाण्याचा ठेका : सतेज पाटील समर्थक, काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

कोल्हापूर : फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण, भिरभिरणारे काँग्रेसचे झेंडे आणि माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या जयजयकाराने ‘अजिंक्यतारा’ कार्यालयाचा परिसर सोमवारी दुमदुमून गेला. महानगरपालिका निवडणुकीत माजी मंत्री पाटील यांनी एकहाती २७ जागा मिळविल्याचा जोरदार जल्लोष काँग्रेस कार्यकर्ते आणि समर्थकांनी केला. तब्बल साडेपाच तास याठिकाणी त्यांचा जल्लोष सुरू होता.निकालाची प्रक्रिया संपल्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास माजी मंत्री पाटील हे ताराबाई पार्क अजिंक्यतारा कार्यालयात आले. त्यांच्यापाठोपाठ डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष संजय डी. पाटील, प्रतिमा पाटील, ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील आले. त्यांनी माजी मंत्री पाटील यांना शुभेच्छा दिल्या. याठिकाणी ते आले असल्याचे समजताच कार्यकर्ते आणि समर्थकांनी गर्दी केली. कार्यालयाच्या आवारात ध्वनियंत्रणेवरील गाण्यांच्या ठेक्यावर युवा कार्यकर्त्यांनी नृत्याचा ठेका धरला, शिवाय त्यांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी केली. तसेच माजी मंत्री पाटील यांच्या जयजयकाराच्या घोषणांनी कार्यकर्ते, समर्थकांनी परिसर दुमदुमून सोडला. शुभेच्छा स्वीकारण्यासाठी माजी मंत्री पाटील हे ऋतुराज पाटील यांच्यासमवेत येताच कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेत. त्यांच्यावर गुलालाची उधळण करून जोरदार जल्लोष केला. कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद ओसंडून वाहत होता. दरम्यान, बलराम कॉलनीतून अपक्ष निवडून आलेल्या राहुल माने यांनी माजी मंत्री पाटील यांची भेट घेतली. (प्रतिनिधी)कार्यकर्र्त्यांचे कष्ट, बळामुळेच यश : पाटीलकार्यकर्त्यांचे कष्ट, त्यांनी दिलेले बळ आणि शहरवासीयांनी टाकलेल्या विश्वासामुळेच महापालिकेत मोठे यश मिळविता आले. त्याचे भान मला असून, शहरवासीयांना दिलेला विकासाचा ‘शब्द’ पाळण्यासाठी पाठबळ द्या, असे आवाहन माजी मंत्री सतेज पाटील यांनी केले. अजिंक्यतारा कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांसमोर ते बोलत होते. यावेळी पाटील म्हणाले, कोणावरही टीका-टिप्पणी करण्याऐवजी विकासाचा मुद्दा घेऊन कार्यरत राहिल्याने शहरवासीयांनी माझ्यावर विश्वास टाकून मोठे यश मिळवून दिले. त्यामुळे माझ्यासह आता प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी वाढली आहे. शहरवासीयांना निवडणुकीपूर्वी दिलेला विकासाचा ‘शब्द’ पूर्ण करणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांची ताकद, साथ कायम राहणे महत्त्वाचे आहे.ऋतुराज पाटील यांची साथया निवडणुकीत माजी मंत्री पाटील यांना त्यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांची मोठी साथ लाभली. कसबा बावडा येथील प्रभागांतील प्रचाराची धुरा ऋतुराज यांनी माजी मंत्री पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून सांभाळली. याबद्दल अनेकांनी त्यांना भेटून त्यांचे कौतुक केले.