शहरं
Join us  
Trending Stories
1
आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी; राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी, निवडणुकांची चाचपणी
2
पाकिस्तानच्या थाळीतून टोमॅटो गायब! लाहोर, कराचीत महागाईचा भडका; अफगाणिस्तानने शिकवला 'हा' धडा
3
ट्रम्प-पुतिन भेट रद्द; व्हाईट हाऊसने फेटाळले बुडापेस्ट शिखर परिषदेचे वृत्त
4
आजचे राशीभविष्य : बुधवार २२ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ संभवतो, व्यापारी वर्गाचे गुंतलेले पैसे मिळतील
5
PM मोदींचा स्वदेशी नारा; जनतेला पत्र; ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ बुलंद करण्यासाठी प्रयत्न करा
6
बाधित क्षेत्र ३ हेक्टर मानून मदत; राज्य सरकारचा निर्णय, पूरग्रस्त शेतकऱ्यांना होणार लाभ
7
दीपिका पादुकोण-रणवीर सिंगने पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा; लाडक्या दुआचे खास फोटो केले शेअर
8
अपात्र लाडक्या बहिणींनी उकळले १६४ कोटी रुपये, १२ हजारांवर पुरूष तर अपात्र महिला ७७ हजार
9
मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात ऐन दिवाळीत पावसाचा बार; पुढील तीन दिवस असेच वातावरण राहणार
10
उमेदवार जाहीर होताच महाआघाडीतील दरी स्पष्ट; राजद, काँग्रेस, डाव्या पक्षांनी केले दुहेरी अर्ज
11
बिहार निवडणूक २०२५: १२१ मतदारसंघांत एकूण १,३१४ उमेदवार; महिला मतदारांच्या आधारे ‘जदयु’ बळकट
12
“महाआघाडीला नव्हे, भाजप जनसुराजला घाबरतेय; आमचे उमेदवार फोडतेय”; प्रशांत किशोर यांचा आरोप
13
...तर H1B व्हिसाधारकांना वाढीव शुल्क लागणार नाही; पण वाढ कायम; ट्रम्प प्रशासनाकडून स्पष्टता
14
७ दिवसांत ३३ हजारांनी घसरला दर; लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ८ हजारांनी गडगडली चांदी!
15
सर्व न्यायालयांमधील ‘सू’ व्यवस्था दयनीय; देशातील सर्व हायकोर्टांचा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर
16
विभक्त पती, आईला फ्लॅटमध्ये राहण्यास हायकोर्टाची परवानगी; नेमके प्रकरण काय?
17
नवी मुंबई-पनवेलमध्ये आगीत ६ जणांचा मृत्यू; ठाण्यात एकाच दिवशी आगीच्या सहा घटना
18
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
19
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
20
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती

नावीन्याची आस जागवणारा ‘अभिआस’

By admin | Updated: January 1, 2015 00:04 IST

वाचक चळवळीस बळ : स्त्रियांनी नवीन वाचावे यासाठी प्रयत्न; सदस्यांची होते वैचारिक जागृती

प्रिया दंडगे - कोल्हापूर -स्त्रिया म्हटलं की, त्यांचा बहुतेक वेळ साड्या, दागिने, नटणे-मुरडणे या गोष्टींवर खर्च होतो, असा सार्वत्रिक समज दूर करत गेली ३५ वर्षे येथे नियमितपणे दर्जेदार पुस्तकांचे वाचन आणि त्यावरील चर्चा करणारा बहुसंख्य स्त्रिया असलेला ‘अभिआस’ हा ग्रुप कार्यरत आहे. ही समाजमनाला दिलासा देणारी बाब आहे. प्राचार्या लीलाताई पाटील यांनी सृजन आनंद विद्यालयाची स्थापना १९८५ मध्ये केली त्याचवेळी वाचनप्रेमींना एकत्र करून या ग्रुपची सुरुवात केली. स्त्रियांनी विचार करावा, बुद्धीला ताण द्यावा, प्रत्येक कृती करण्यापूर्वी विचार करावा, ही लीलातार्इंची त्यामागील भूमिका होती. ‘अभिआस’ याचा अर्थ नावीन्याची आस. स्त्रियांनी नवीन लेखक वाचावेत, आपापसांत वैचारिक चर्चा करावी, सुजाण पालकत्व निभवावं, असं लीलातार्इंना वाटत होतं. त्यातूनच त्यांनी ‘अभिआस’ची सुरुवात केली. त्यात जराही खंड न पडता ही वाचन चळवळ अव्याहतपणे सुरू केली आहे.महिन्यातून एकदा एका सभासदाकडे सगळेजण जमतात, आधी ठरलेले पुस्तक सगळेजण वाचून येतात आणि त्या पुस्तकावर एकजण बोलतो. त्यानंतर पुस्तकावर चर्चा होते. जी काही चर्चा होते, ती लिहून काढली जाते. या मासिक बैठकीमध्ये अनेकवेळा लेखकांचाही सहभाग असतो. राजन गवस, रेणू गावस्कर, श्याम मनोहर, डॉ. अनिल अवचट , डॉ. तारा भवाळकर अशा लेखकांसोबत ‘अभिआस’च्या वैचारिक गप्पा रंगल्या आहेत. कधी एका विशिष्ट विषयावर मान्यवर वक्त्याला पाचारण करून त्याचे विचार ऐकले जातात. दरवर्षी ८ मार्च महिला दिनानिमित्त दर्जेदार कार्यक्रम घेतले जातात. ज्योती सुभाष व अमृता सुभाष यांचा ‘काळोखाच्या लेकी’, महिलांच्या स्वच्छतागृहाच्या प्रश्नावर भाष्य करणारे ‘वुमनिया’ हे नाटक, ‘कर्तृत्ववान स्त्रिया’हा मुक्त आविष्कार असे कार्यक्रम ‘अभिआस’ने कोल्हापुरातील रसिकांसाठी केले आहेत. नीमाताई पोतनीस, उषा कल्याणकर, सुमित्रा जाधव, आशा आठल्ये, डॉ. उदयप्रकाश संत, डॉ. नीना संत या बुजुर्ग सभासदांबरोबरच तनुजा शिपूरकर, सुप्रिया काळे, अर्चना देसाई, अशी तरुण पिढीतील मंडळीही ‘अभिआस’मध्ये सामील होत गेली आहेत. सर्वांसाठी खुला ग्रुपसाधारणपणे तीसजणांचा हा ग्रुप वाचन करणाऱ्या सर्वांसाठी खुला आहे. त्याला कुठलेही शुल्क नाही. फक्त वाचनाच्या आनंदात डुंबणारी ही मंडळी महिन्यातील दोन तास सृजनांच्या सहवासात रमली आहेत.