शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलकाला फटकारले

By admin | Updated: June 16, 2016 01:02 IST

जिल्हाधिकारी भडकले : इचलकरंजी दारू दुकान प्रश्न ; तीन तास यंत्रणा वेठीस

कोल्हापूर : इचलकरंजी येथील बावणे गल्लीतील दारूचे दुकान बंद करण्यासाठी आत्मदहनाचा इशारा दिलेले आंदोलक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्याय संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजय जाधव यांना जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी बुधवारी चांगलेच फटकारले. ‘या गुन्हेगाराला येथे का आणलंत?’ अशी विचारणा त्यांनी ‘उत्पादन शुल्क’च्या अधिकाऱ्यांना केली. ‘तुम्हीच काही ते उत्तर द्या,’ असे सांगून काही मिनिटांतच ही चर्चा संपविली. अखेर ‘दुधाची तहान ताकावर’ या म्हणीनुसार उत्पादन शुल्कचे अधीक्षक राजेश कावळे यांचे लेखी पत्र स्वीकारत आंदोलन स्थगित करीत असल्याचे जाधव यांनी सांगितले; परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला ‘गुन्हेगार’ संबोधल्याबद्दल उद्या, गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा जाधव यांनी यावेळी दिला. या आत्मदहन नाट्यामुळे तब्बल तीन तास यंत्रणा वेठीस धरली गेली.या दुकानासंदर्भात सात दिवसांत कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले होते; परंतु ती मुदत १० जूनलाच संपली असून या कालावधीत कारवाई न झाल्यास बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करू, असा इशारा विजय जाधव यांनी दिला होता. त्यानुसार जाधव हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत सकाळी ११ च्या सुमारास येथे आले. त्यांच्यासोबत इचलकरंजी येथील उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एल. एम. शिंदे, उपनिरीक्षक पी. एस. कोरे हेही आले होते. आत्मदहनाच्या इशाऱ्याने यंत्रणा सतर्क झाली होती. जाधव यांनी यासंदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांना भेटून चर्चा करू, अशी भूमिका घेतल्याने उपस्थित अधिकाऱ्यांची अडचण झाली; कारण जिल्हाधिकाऱ्यांसह निवासी उपजिल्हाधिकारी हे व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये होते. त्याला वेळ लागणार असल्याने इतर अधिकाऱ्यांची भेट घालून देतो असे पोलिसांनी सांगितले; तरीही जाधव हे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. दुपारी दोनच्या सुमारास त्यांची जिल्हाधिकाऱ्यांशी भेट झाली. यावेळी कार्यवाहीबाबत यापूर्वी आंदोलक महिलांना आपण सांगितले असून त्याही सकारात्मक आहेत, असे असताना ‘प्रशासनाला वेठीस धरणाऱ्यांना वेगळं काय सांगायचं, असे सांगून ज्याच्यावर १८ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत, तसेच बाटल्या फोडून प्रशासनाला वेठीस धरणाऱ्या गुन्हेगाराला तुम्ही या ठिकाणी का आणलं?’ अशी विचारणा जिल्हाधिकाऱ्यांनी उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना केली. त्यामुळे ‘तुम्हीच काही ते उत्तर द्या,’ असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार अधीक्षक कावळे यांनी ‘दुकान बंद करण्याची कार्यवाही जलदगतीने सुरू असून या प्रकरणी जिल्हाधिकारी लवकरच सकारात्मक निर्णय घेतील,’ असे लेखी पत्र बाहेर येऊन आंदोलक विजय जाधव यांना दिले. त्यानंतर त्यांनी हे आंदोलन स्थगित केल्याचे पत्रकारांना सांगितले. (प्रतिनिधी)