शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

शेतकरी संघाच्या सभेत सत्तारूढ आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : विरोधकांच्या तक्रारीवरून अध्यक्षांसह संचालकांची झालेली अपात्रता, त्यातून न्यायालयाने दिलेला निकाल या सर्व घडामोडींचे शेतकरी संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पडसाद उमटले. संघाची नाहक बदनामी केल्याबद्दल सत्तारूढ समर्थकांनी आक्रमक भूमिका मांडत तक्रारदार सुरेश देसाई यांच्या ‘सभासदत्व रद्द’चा ठराव मांडला.शेतकरी सहकारी संघाची ७७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी शाहू ...

ठळक मुद्दे सुरेश देसार्इंचे सभासदत्व रद्दचा ठराव : ‘रायबाग’ कारखाना विमा हप्त्याचा दावा मागेगावाच्या पैशांवर आकारामाच्या उड्या सुरू असतील, तर त्याची चौकशी करायला हवी.एका मिनिटात विषयपत्रिकेवरील विषयांना सभेने मंजुरी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : विरोधकांच्या तक्रारीवरून अध्यक्षांसह संचालकांची झालेली अपात्रता, त्यातून न्यायालयाने दिलेला निकाल या सर्व घडामोडींचे शेतकरी संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पडसाद उमटले. संघाची नाहक बदनामी केल्याबद्दल सत्तारूढ समर्थकांनी आक्रमक भूमिका मांडत तक्रारदार सुरेश देसाई यांच्या ‘सभासदत्व रद्द’चा ठराव मांडला.

शेतकरी सहकारी संघाची ७७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी शाहू स्मारक भवन येथे झाली. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील होते. दोन वर्षांत पारदर्शक कारभार केल्याने संघ कोट्यवधीच्या नफ्यात आला. त्यातून कर्मचाºयांची प्रलंबित देणी देऊन १२ टक्के लाभांश दिल्याचे सांगत अध्यक्ष युवराज पाटील म्हणाले, मध्यंतरी काही मंडळींनी विनाकारण टीकाटिपणी करून चांगल्या चाललेल्या संघाची बदनामी केली. ज्यांनी संघाला नुकसानीत लोटले तेच टीका करीत असल्याने वाईट वाटते; पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालू आर्थिक वर्षात संघाचा नफा दोन कोटी करण्याचा मानस आहे.

जयसिंग हिर्डेकर म्हणाले, काही विघ्नसंतोषी मंडळींनी बदनामी केली. त्यांचा निषेध करावा. सुरेश देसाई यांनी नाहक बदनामी केली असून, त्यांचे सभासदत्व रद्द करण्याचा ठराव नंदकुमार पाटील (बिद्री) यांनी मांडला. त्यास मारुती पाटील (नणुंद्रे) यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-भुयेकरांनी देसाई यांच्यासह विरोधकांचा जोरदार समाचार घेतला.

रायबाग साखर कारखान्याबाबत उच्च न्यायालय व विमा हप्त्यांत दावे सुरू असल्याने संघाची मोठी रक्कम खर्ची पडते, यासाठी हे दावे मागे घेण्याचा ठराव आकाराम पाटील यांनी मांडला. यावर तत्कालीन संचालक मंडळांकडून रक्कम वसूल करण्याची मागणी जयसिंग हिर्डेकर यांनी केली. विम्याबाबतचा दावा मागे घेण्याचा निर्णय झाला. नामदेव चांदणे, सूर्यकांत पाटील, संभाजीराव भोसले, आदींनी चर्चेत भाग घेतला. संघाच्या अडत दुकानात सर्वाधिक गूळ पुरवठा करण्याकामी मोहन पाटील, शिवाजी पाटील, अविनाश चौगुले यांचा; तर खतांची चांगली विक्री केल्याबद्दल व्यवस्थापकांचा सत्कार रोख बक्षीस देऊन करण्यात आला. उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी आभार मानले. यावेळी अण्णासाहेब चौगुले, मानसिंगराव जाधव, यशवंत पाटील, अमरसिंह माने, जी. डी. पाटील, एम. एम. पाटील, शशिकांत पाटील, विजयकुमार चौगुले, विनोद पाटील, बाळकृष्ण भोपळे, व्यंकाप्पा भोसले, सुमित्रादेवी शिंदे, शोभना शिंदे, विजयादेवी राणे उपस्थित होते. व्यवस्थापक आप्पासाहेब निर्मळ यांनी अहवाल वाचन केले. एका मिनिटात विषयपत्रिकेवरील विषयांना सभेने मंजुरी दिली.अध्यक्षांसाठी ‘फॉर्च्युनर’ अन् अभिनंदन!संघाचे अध्यक्ष गाडीत बसले की दिसत नाहीत; त्यामुळे नवीन घेतलेली ‘इनोव्हा’ बदलून ‘फॉर्च्युनर’ गाडी घ्या, असा ठराव उपस्थितांनी केला. संचालकांच्या अभिनंदनाचा ठराव करीत पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील पंचायत समितीचे सदस्य मोहन पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.पैसे गावाचे अन् उड्यापाडळी गावच्या वतीने आकाराम पाटील यांनी संचालकांचा सत्कार केल्याचा उल्लेख करीत बाबासाहेब पाटील म्हणाले, सत्काराचे पैसे गावातील लोकांकडून गोळा करणार आणि आकाराम सत्कार करणार. गावाच्या पैशांवर आकारामाच्या उड्या सुरू असतील, तर त्याची चौकशी करायला हवी.या झाल्या मागण्याजुन्या सभासदांकडून ५०१ रुपये शेअर्स वर्गणी भरून घ्या.पूर्वीप्रमाणे दिवाळीला भेट द्या.खतविक्रीतून सर्वाधिक नफा मिळत असल्याने त्याकडे लक्ष केंद्रित करा.साखर, रॉकेल विक्रीशिवाय इतर व्यवसायांत उतरा.