शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाघजाई डोंगरावर एजंट, धनदांडग्यांचा डोळा

By admin | Updated: November 18, 2014 23:36 IST

३५० हेक्टर जमीन होणार गायब : स्थानिक एजंटांसह महसूल कर्मचाऱ्यांचा समावेश

कोतोली : पन्हाळा तालुक्यातील वाघजाई डोंगरावरील ३५० हेक्टर जमीन सध्या वेगळ्याच चर्चेमध्ये अडकली असून, तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे. शाहू महाराजांनी जनतेला कसून खाण्यासाठी दिलेली जमीन आज गावपातळीवर तसेच जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या एजंटांनी धनदांडग्यांच्या घशात घालण्याचा डाव चालविला आहे. तर या एजंटांच्या गळाला शासकीय कर्मचारी असल्याची चर्चा आहे. पन्हाळा व करवीर अशा दोन्ही तालुक्यांच्या हद्दीत वाघजाई डोंगरावर ३५० हेक्टर जमीन असून, जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या ८ जून १९७३ चा आदेश क्र. आर बी / एलएनएडी / डब्ल्यू आय १३७३/७३ नुसार यातील काही जमीन ५१० शेतकऱ्यांना व काही जमीन माजी सैनिक, राधानगरी, सातार्डे, म्हाळुंगे येथील धरणग्रस्त अशा शेतकऱ्यांना विभागून सत्ता प्रकरणे (१)च्या आधारे कसून खाण्यासाठी दिली होती. त्यापैकी ५१० शेतकऱ्यांपैकी ३०० शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी कब्जेपट्टी करून व रितसर ताबा घेतला असून, ७/१२ पत्रकी नोंदी घातल्या आहेत. उर्वरीत २१० शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी कब्जेपटी करून घेतलेली नाही. सदर जमिनीवर महाराष्ट्र शासन नमूद असल्याचे समजते, अशी परिस्थिती असतानाही सदरच्या जमिनी महसूल कर्मचाऱ्यांना हाताशी धरून एजंटांनी आपला खेळ सुरू केला आहे, तर सदरच्या जमीन मालकांना सांगून ही जमीन शासन परत घेणार आहे. त्यापेक्षा पैसे मिळवून घ्या, असा राग एजंट शेतकऱ्यांच्या जवळ गात बसले आहेत. एजंटाकडून कमी दराने जमिनी धनदांडग्यांच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. (वार्ताहर)परत ताबा घेणार का?धनदांडग्या लोकांवर शासन जमीन खरेदीचा शिक्कामोर्तब होणार का? किंवा ज्यांना जमिनी कसून खायला दिल्या, अशा लोकांनी जमिनी विकल्यास त्या जमिनी शासनाच्या नियमाचा भंग केला म्हणून परत ताबा घेणार का? असे प्रश्न परिसरात चर्चेचा विषय झाले आहेत.