शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आजरा-विकास आघाडीने उचलला सत्तांतराचा विडा

By admin | Updated: May 21, 2015 00:09 IST

कार्यकर्त्यांचा मेळावा : आजरा तालुका खरेदी-विक्री संघ निवडणूक

आजरा : आजरा तालुका खरेदी-विक्री संघाच्या कारभारावर प्रचंड टीका करीत बँकेचे संचालक अशोकअण्णा चराटी यांच्या अध्यक्षतेखाली व गोकुळचे संचालक रवींद्र आपटे आजरा कारखाना अध्यक्ष विष्णूपंत केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आजरा येथे पार पडलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आजरा विकास आघाडीची स्थापना करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी तालुका संघाच्या निवडणुकीत सत्तांतराचा निर्धार व्यक्त केला.आजरा महाविद्यालयाच्या सभागृहात प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. स्वागत आजरा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विलास नाईक यांनी केले.आजरा कारखान्याचे अध्यक्ष विष्णूपंत केसरकर म्हणाले, तालुका खरेदी-विक्री संघाचा कारभार स्व. राजारामबापू देसाई यांच्या पश्चात त्यांच्या मुलाने कसा चालविला आहे हे सर्वश्रृत आहे. तालुका खरेदी-विक्री संघ आजरा तालुक्याचे वैभव समजले जाते. भविष्यात संघाला चांगले दिवस येण्यासाठी सक्षम व्यक्तींच्या हातात संघाची सत्ता राहिली पाहिजे. गेल्या दहा वर्षांत दोन ते अडीच लाखांच्या पुढे संघाचा कधी नफा गेला नाही. दहावी-बारावी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार आणि सभासदांना वर्षातून एकदा लाडू चिवडा असाच काहीसा प्रकार सुरू आहे. सभासदांना परिवर्तन हवे आहे आणि जिल्हा बँक निवडणूक निकालाची पुनरावृत्ती संघात झाल्याशिवाय राहणार नाही, असेही केसरकर यांनी सांगितले.जिल्हा बँकेचे संचालक चराटी म्हणाले, ३५ कोटींची उलाढाल असलेल्या संघात नफा अत्यल्प होतो. यामागचे गौडबंगाल काय ? संघाच्या कारभाराबाबत योग्य वेळ येताच बोलू. मात्र, संघात सत्तांतर होणार हे स्पष्ट आहे, असा विश्वास केला.‘गोकुळ’चे संचालक रवींद्र आपटे म्हणाले, सक्षम पॅनेल तयार करून आपण निवडणुकीला सामोरे जावू. एकोप्याने काम केल्यास घवघवीत यश मिळेल, असेही स्पष्ट केले.संभाजी तांबेकर, नामदेव नार्वेकर, सदानंद व्हनबट्टे, मारूती घोरपडे, महादेव पाटील, डॉ. इंद्रजीत देसाई, गंगाधर पाटील, एन. डी. केसरकर, गंगाधर पाटील, दिगंबर देसाई, प्रा. सुनील शिंत्रे, जि.प.चे माजी अध्यक्ष उमेश आपटे, प्रकाश वाटवे यांची भाषणे झाली. अजित चराटी, काशिनाथ तेली, महादेव पाटील, दत्तू कोकितकर, बयाजी मिसाळ, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, राजू होलम, बी. टी. जाधव, गोविंद सावंत, राजू जाधव, डॉ. अनिल फर्नांडिस यांच्यासह सेवा संस्थांचे ठरावधारक उपस्थित होते. (प्रतिनिधी)