शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

‘एव्हीएच’ विरोधात पुन्हा एल्गार

By admin | Updated: January 31, 2015 00:24 IST

आंदोलन चिघळणार : पदाधिकारी देणार राजीनामे, पाटणे फाटा येथील आंदोलनात निर्णय

चंदगड : हलकर्णी (ता. चंदगड) येथील औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू झालेल्या एव्हीएच केमिकल्स कंपनीविरोधात गेले वर्षभर थंड असलेल्या आंदोलनाने आज, शुक्रवारी पुन्हा उभारी घेतली. एव्हीएच विरोधात आज पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. आंदोलन तीव्र करण्यासाठी येत्या आठ दिवसांत शाळा-महाविद्यालये बंद ठेवणार व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आदींनी राजीनामे देऊन आंदोलनाला पाठिंबा देण्याचे ठरविण्यात आले.सर्वपक्षीय बैठकीत आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक राज्याने या एव्हीएच प्रकल्पाला परवानगी नाकारली होती. मात्र, आमच्या सरकारने या माणसे मारणाऱ्या प्रकल्पाला परवानगी देऊन तो चंदगडकरांच्या माथी मारला. याला येथील जनतेचा कालही विरोध होता आणि आजही राहणार व भविष्यातही विरोध राहणार असल्याचे सांगितले.डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी यावेळी चंदगडच्या जनतेच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. एव्हीएच प्रकल्पाचे उत्पादन जनतेच्या जिवावरच दोन वर्षे थोपवून धरले आहे. मात्र, पैशाने माणसं फोडणाऱ्या कंपनी व्यवस्थापनाला जनरेट्यामुळे कंपनी बंदच करावी लागेल. एव्हीएच बंद करण्यासाठी शेवटचा लढा गट-तट न ठेवता लढुया, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी संग्राम कुपेकर, माजी सरपंच अरुण पाटील, रामराजे कुपेकर, अ‍ॅड. संतोष मळवीकर, प्रा. एन. एस. पाटील, सुरेशराव चव्हाण-पाटील, भाऊ गडकरी यांनीही मनोगत व्यक्त केले.सरपंच शिवाजी तुपारे, देवाप्पा बोकडे, जिल्हा परिषद सदस्या सुजाता पाटील, एम. जे. पाटील, बी. डी. पाटील, संजय पाटील, जानबा कांबळे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)