शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांच्या तंबीनंतर यंत्रणा लागली कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 00:44 IST

कोल्हापूर : पंचगंगा नदीच्या प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याबद्दल कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त व इचलकरंजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिल्यानंतर मंगळवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाची यंत्रणा कामाला लागली. त्यांनी महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राची पाहणी केली व इचलकरंजीतील प्रदूषण करणाऱ्या घटकांचे सर्वेक्षण सुरू केले.महापालिकेच्या ...

कोल्हापूर : पंचगंगा नदीच्या प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याबद्दल कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त व इचलकरंजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिल्यानंतर मंगळवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाची यंत्रणा कामाला लागली. त्यांनी महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राची पाहणी केली व इचलकरंजीतील प्रदूषण करणाऱ्या घटकांचे सर्वेक्षण सुरू केले.महापालिकेच्या १७ एमएलडी क्षमतेचे दुधाळी येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्र पूर्ण झाले असले तरी ते अद्याप कार्यान्वित झालेले नाही. त्यामध्ये किमान चार टँकर पाणी व जैविक कल्चर सोडण्याची गरज आहे. ती व्यवस्था झालेली नाही. या कामाची पाहणी व प्रत्यक्ष पंचनामा करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी तिथे गेले होते; परंतु तिथे महापालिकेचे कुणी अधिकारी बोलावूनही आले नसल्याने ही कार्यवाही झाली नाही. आम्ही अगोदर महापालिकेकडून योग्य ती कार्यवाही व्हावी यासाठी प्रयत्नशील आहोत. ती न झाल्यास कारवाई केली जाईल, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी प्रशांत गायकवाड यांनी सांगितले. प्रादेशिक अधिकाºयांना फोन केल्यावर त्यांच्याकडे कार्यवाही अथवा कारवाईचे कोणतेच अपडेट्स नव्हते. याबाबत आज, बुधवारी मी माहिती घेऊन आपल्याला सांगतो, असे त्यांनी सांगितले.दरम्यान, थेट पर्यावरण मंत्र्यांनी आदेश देऊनही पंचगंगा प्रदूषणाबाबत महापालिका प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप व तशी लेखी तक्रार प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सायंकाळी केली. यापूर्वी या प्रदूषणाबाबत उच्च न्यायालय, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी आणि आता थेट मंत्र्यांनी आदेश देऊनही महापालिका मात्र प्रदूषणाबाबत फारशी गंभीर नसल्याचा आरोप देसाई यांनी या तक्रारीत केला आहे.दोषी प्रोसेसर्सबंद करणारइचलकरंजीतील प्रोसेसर्सच्या सांडपाण्यावर योग्य ती प्रक्रिया पार पडते की नाही याची तपासणी करण्याबरोबरच दोषी कारखाने बंद करण्यात येतील, असा इशारा मुख्याधिकारी दीपक पाटील यांनी दिला.