शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांनंतर आवाडे कॉँग्रेस भवनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : काँग्रेस पक्षातील कार्यपद्धतीवरून नाराज असलेले माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी सहा महिन्यांनंतर येथील काँग्रेस भवनामध्ये उपस्थिती दर्शविली. सद्य:स्थितीमध्ये नागरिकांसमोरील अनेक समस्यांना वाचा फोडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, जिल्ह्यासोबत राज्यातील कॉँग्रेसकडून त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. कॉँग्रेसच्या अशा दुर्लक्ष करण्याच्या परिस्थितीमध्ये बदल होत नाही, तोपर्यंत ...

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : काँग्रेस पक्षातील कार्यपद्धतीवरून नाराज असलेले माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी सहा महिन्यांनंतर येथील काँग्रेस भवनामध्ये उपस्थिती दर्शविली. सद्य:स्थितीमध्ये नागरिकांसमोरील अनेक समस्यांना वाचा फोडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, जिल्ह्यासोबत राज्यातील कॉँग्रेसकडून त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. कॉँग्रेसच्या अशा दुर्लक्ष करण्याच्या परिस्थितीमध्ये बदल होत नाही, तोपर्यंत मी पक्षापासून अलिप्त राहणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले.शहर कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष कै. मल्हारपंत बावचकर यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने येथील शहर कॉँग्रेस समितीमध्ये त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यासाठी आवाडे कॉँग्रेस भवनमध्ये आले होते. त्यावेळी ते पुढे म्हणाले, बावचकर हे माझे राजकीय गुरू आणि पितृतुल्य असल्यामुळे त्यांना अभिवादन करण्यासाठी मी आलो होतो. राज्यात आणि केंद्रामध्ये सध्या कॉँग्रेसची भूमिका विरोधकाची आहे. मात्र, ती प्रभावीपणे पार पाडली जात नसल्याने जनतेमध्ये संभ्रमावस्था पसरली आहे. कॉँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांची जी भूमिका, तीच माझी भूमिका असणार आहे. त्यामुळे आगामी वाटचालीबाबत कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधूनच निर्णय घेण्यात येईल, असेही आवाडे यांनी शेवटी स्पष्ट केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहर अध्यक्ष प्रकाश मोरे होते. कार्यक्रमासाठी अशोकराव सौंदत्तीकर, नगरसेवक सुनील पाटील, शशांक बावचकर, राहुल खंजिरे, बाळासाहेब कलागते, शेखर शहा, अंजली बावणे, रत्नप्रभा भागवत, आनंदा साळुंखे, जेवरबानू दुंडगे, मंगल सुर्वे, शोभा कापसे, आदी उपस्थित होते.