शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठल-रखुमाई पतसंस्था बुडीत निघाल्यानंतर ‘रणजितसिंहांचे हात वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : मुरगूड (ता. कागल) येथील विठ्ठल-रखुमाई पतसंस्था बुडीत निघाल्यानंतर मागणी व संमती नसतानाही ‘गोकुळ’चे संचालक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

काेल्हापूर : मुरगूड (ता. कागल) येथील विठ्ठल-रखुमाई पतसंस्था बुडीत निघाल्यानंतर मागणी व संमती नसतानाही ‘गोकुळ’चे संचालक रणजितसिंह पाटील यांनी आमचा संचालक मंडळात समावेश केल्याचा आरोप संचालक रघुनाथ बोंगार्डे, जगन्नाथ पुजारी, मारुती ठाणेकर, बाळकृष्ण लोकरे, एकनाथ पाटील, रणजित सासणे यांनी पत्रकातून केला.

संस्था स्थापनेपासूनच रणजितसिंह पाटील यांनी पै- पाहुणे व आप्तेष्टांनाच कोट्यवधींचे कर्ज वाटप केले. हा सगळा कारभार त्यांनी एकाधिकारशाहीनेच केला आहे. व्यवहारातील अनियमित बाबींमुळे ही संस्था सन २००६ साली बंद पडली. त्यानंतर ठेवीदार व सरकारी देण्याचा ससेमिरा चुकविण्यासाठी मूळ संचालक मंडळाची नावे बाजूला ठेवून, सध्या अस्तित्वात असलेल्या संचालक मंडळाची नावे देण्यात आली. ही प्रक्रिया बोगसपणे राबवली. विशेष म्हणजे सगळे करून २८ ऑगस्ट २००६ पासून आपण संचालक नसल्याचे रणजितसिंह पाटील यांनी सहकार खात्याला लेखी देऊन हात वर केले. मात्र, २०१७ च्या ‘बिद्री’ कारखाना निवडणुकीत आपल्या नावाचा ठराव केला. त्यांनी एकाधिकारशाहीने वाटप केलेली कर्जे व सरकारची रक्कमही स्वत: भरावी, आमच्याकडे वसुलीचा तगादा लागल्यास आंदोलन उभे करू, असा इशारा या संचालकांनी दिला आहे.

धक्क्याने संचालिकेचा मृत्यू

संस्थेच्या थकबाकी व सरकारी देय रकमेच्या धक्क्याने तीन महिन्यांपूर्वी श्रीमती गुणवंती महादेव भारमल (मुरगूड) या संचालिकेचा मृत्यू झाल्याचे आराेप संचालकांनी केला.

पॅकेज वाटपामध्येही अनियमितता......

ठेवीदारांनी लोक न्यायालयातही दाद मागितल्यानंतर ठेवी परत करण्यासाठी संचालक मंडळाला अंधारात ठेवून चार कोटींचे पॅकेजही मिळविले. ठेवीदार नसणाऱ्यांनाही पॅकेजमधून धनादेश वाटप केल्याचा आरोप संचालकांनी केला.