शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

जयसिंगपूरनंतर आता कुरुंदवाड होणार भूकमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 04:35 IST

जयसिंगपूर शहराला भूकमुक्त करणाऱ्या जयसिंगपूर युवा फाऊंडेशनने आता कुरुंदवाडला भूकमुक्त करण्याचा विडा उचलला आहे.

चंद्रकांत कित्तुरे कोल्हापूर : जयसिंगपूर शहराला भूकमुक्त करणाऱ्या जयसिंगपूर युवा फाऊंडेशनने आता कुरुंदवाडला भूकमुक्त करण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठी सर्व्हे सुरू आहे. निराधार, अपंग, वृद्ध यांच्यासाठी असलेला हा उपक्रम ४ एप्रिलपासून सुरू होणार आहे. जयसिंगपूर शहरातील काही युवकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या जयसिंगपूर युवा फाऊंडेशनने शहरातील गरीब, हलाखीत जीवन जगणारे वृद्ध, निराधार, अपंग, मानसिक रुग्ण यांच्यासाठी पाच वर्षांपूर्वी दररोज दोन वेळचे जेवण, सकाळी नाष्टा देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. सध्या शहरातील ६५ वृद्ध निराधारांना दररोज भोजन, नाष्टा दिला जातो. दोन्ही वेळचे जेवण सकाळीच दिले जाते. देणगीदारांच्या मदतीमधून हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाला कनकभाई शहा, भाऊसाहेब नाईक, डॉ. गनबावले, डॉ. प्रवीण जैन, सुदर्श कदम यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभत आहे. जयसिंगपूरनंतर हा उपक्रम तालुक्यात वाढवावा, असा विचार पुढे आल्यानंतर शिरोळ तालुक्यातील दुसरे मोठे शहर म्हणून कुरुंदवाड शहराची निवड करण्यात आली आहे. त्यादृष्टीने कुरुंदवाडमधील वृद्ध, अपंग, निराधार, विकलांग यांचा सर्व्हे सुरू आहे अशी माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष अझहर पटेल यांनी केले आहे.>आरोग्य तपासणीहीजयसिंगपुरात ज्यांना भोजन, नाष्टा दिला जातो. त्या सर्वांची महिन्यातून एकदा डॉक्टरांकडून तपासणीही केली जाते. येत्या ४ एप्रिलला फाऊंडेशनच्या या उपक्रमाला पाच वर्षे पूर्ण होत आहेत.