शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पराभवानंतर शिवसेनेत अस्वस्थता

By admin | Updated: November 9, 2015 00:29 IST

महापालिकेचे राजकारण : आमदार क्षीरसागर विरोधकांना उकळ्या

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीत शिवसेनेला मानहानीकारक पराभव पत्करावा लागल्याने पक्षात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते नेत्यांवर थेट आगपाखड करू लागल्याने त्याचे दूरगामी परिणाम पक्षसंघटनेवर होणार हे निश्चित आहे. निवडणुकीतील अपयशाने आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विरोधकांना चांगल्याच उकळ्या फुटल्या असून, त्यांनी ‘मातोश्री’पर्यंत योग्य तो संदेश पोहोचविण्याची तयारी सुरू केली आहे. शिवसेनेच्या दृष्टीने महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची होती. गेले दहा वर्षे शहरातून शिवसेनेचा आमदार निवडून येतो, पण महापालिकेवर सत्ता का मिळत नाही? असा प्रश्न शिवसैनिकांसह पक्षाच्या वरिष्ठांना पडत होता. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेतील आमदार राजेश क्षीरसागर व जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यातील अंतर्गत वाद मिटवून पक्षश्रेष्ठींनी दोघांनाही कामाला लावले होते. गेले सहा महिने महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून पक्षाने येथे भगव्या सप्ताहासारखे कार्यक्रम घेऊन वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला. निवडणूक जाहीर झाल्यानंतर शहरात वातावरणनिर्मिती करण्यात ते सगळ्यात पुढे होते; पण उमेदवार निवडीनंतर पक्षांतर्गत धुसफुस सुरू झाली. केवळ इलेक्टिव्ह मेरिट हे कारण पुढे करत निष्ठावंत शिवसैनिकांना डावलण्यात आले. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनीच बंडखोरी केल्याने पक्षाला मोठा फटका बसला. उमेदवारी देताना झालेले साटे-लोटे व बंडखोरी पाहता पक्षाला फारसे यश मिळणार नाही, हे निश्चित होते. प्रमुख विरोधी पक्षांनी तर शिवसेनेला प्रतिस्पर्धीच मानले नसल्याने त्यांच्यावर टीका करून आपली ताकदही वाया घालविली नाही. अपेक्षेप्रमाणे पक्षाला फक्त चार जागा मिळाल्या, त्याही स्वत:च्या ताकदीवरच आल्या. गेले सहा वर्षे शहरात शिवसेनेचे आमदार असताना पक्षाची वाताहत होतेच कशी? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. निवडणुकीत नेत्यांनी खेळलेल्या अंतर्गत खेळ्या, त्याचा निकालावर झालेला परिणाम याचा लेखाजोखा पक्षश्रेष्ठींनी मागविला आहे. दुसऱ्या फळीतील निष्ठावंत कार्यकर्त्यांनीही नेत्यांच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. त्यांनी थेट राजीनाम्याची मागणी केल्याने आगामी काळात पक्षसंघटना टिकविणे नेत्यांसमोर आव्हान आहे. कोल्हापूरकरांनी लाटेतही सहा आमदार दिल्याने मंत्रिपदाची संधी आहे. मंत्रिपदासाठी आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. त्यामध्ये क्षीरसागर यांचे नाव सुरुवातीपासून आघाडीवर आहे. महापालिका निवडणुकीत शिवसेना किंगमेकर ठरली असती तर आमदार क्षीरसागर यांच्यादृष्टीने जमेची बाजू ठरली असती; पण नामुष्कीजनक पराभवामुळे श्रेष्ठींच्या दरबारी त्यांचे वजन काहीसे कमी होणार आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. अशा परिस्थितीत कोल्हापूरला संधी मिळालीच तर क्षीरसागर यांचे स्पर्धक वाढणार आहेत. आमदार नरके यांनीही जोरदार फिल्डिंग लावली आहे. ‘गोकुळ’चे संचालक अरुण नरके यांचे शिवसेनेतील नेत्यांशी जुने संबंध आहेत. त्यांच्यामार्फत त्यांनी यंत्रणा कार्यरत केली आहे. आमदार मिणचेकर यांच्यासाठी एक बडा उद्योगपती प्रयत्नशील आहे. त्यामुळे मंत्रिपदाची संधी मिळाली तर ती कोणाला? हे जरी खरे असले तरी या संधी मागे पालिकेचे राजकारण असणार हे निश्चित आहे. (प्रतिनिधी)‘सोयीच्या राजकारणा’ने वजाबाकीशिवसेनेने ओढून-ताणून ८१ उमेदवार उभे केले होते; पण उमेदवारी देताना त्यांनी अनेक ठिकाणी विधानसभा निवडणुकीतील उपकाराची परतफेड केल्याचे स्पष्ट दिसते. ‘सोयीचे राजकारण’ करण्यात नेते यशस्वी ठरले; पण पक्षात मात्र वजाबाकीच झाल्याची चर्चा सुरू आहे.