शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
5
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
6
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
7
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
8
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
9
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
10
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
11
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
12
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
13
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
14
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
15
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
16
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
17
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
18
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
19
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
20
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...

कावीळने शाळकरी मुलाच्या मृत्यूनंतर यंत्रणा संतर्क

By admin | Updated: January 2, 2015 00:57 IST

शिरढोण येथे वैद्यकीय पथक दाखल

कुरुंदवाड : शिरढोण (ता. शिरोळ) येथे कावीळच्या साथीने वैभव प्रकाश पाटील याचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. एस. दातार, नांदणी प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी एस. आर. गुरव यांनी गावाला भेट देऊन दूषित पाणी व साथीच्या आजारांबाबत माहिती घेतली व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या. बुधवारी (दि. ३१) सकाळी काविळीच्या आजाराने वैभवचा मृत्यू झाला. पंचगंगा व कृष्णानदीच्या दूषित पाण्यामुळे गावामध्ये रुग्णांची संख्या वाढत असताना ग्रामपंचायत व आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच आरोग्य यंत्रणा सक्रिय झाली. तालुका वैद्यकीय अधिकारी दातार यांनी केंद्राचे अधिकारी आरोग्य सेवक यांची बैठक घेऊन दूषित पाण्याबाबत जागृती करणे, घरोघरी भेट देऊन रुग्णांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यासाठी पथकही नेमले आहे. तसेच नदीचे पाणी उकळून पिण्यासाठी गावामध्ये दवंडी देण्याचे आदेश ग्रामपंचायतीला दिले. यावेळी नांदणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुपरवायझर मानसिंग वडर, आरोग्य सेवक बी. एस. सनदी, ए. बी. घोलप, के. बी. एरंडोले, व्ही. के. शिंदे, पी. पी. मुळे, डी. के. ढाले, एम. एस. घुणके, आदी वैद्यकीय पथकातील कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)शाळा गहिवरलीवैभव हा कुमार विद्यामंदिरातील पहिलीच्या वर्गामध्ये शिकत होता. शांत स्वभावाचा व हुशार असल्याने शिक्षकांचा आवडता विद्यार्थी होता. त्याचा मृत्यू झाल्याने आज, गुरुवारी शाळेत श्रद्धांजलीसाठी उभे राहिले असता शिक्षकांसह अनेक विद्यार्थ्यांना अश्रू आवरता आले नाहीत.