शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

राजू शेट्टींच्या विजयानंतर वाळवा तालुक्यात जल्लोष

By admin | Updated: May 17, 2014 00:18 IST

इस्लामपूर : हातकणंगले लोकसभा मतदार संघातून विद्यमान खासदार व महायुतीचे उमेदवार राजू शेट्टी यांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर वाळवा तालुक्यातील त्यांच्या

इस्लामपूर : हातकणंगले लोकसभा मतदार संघातून विद्यमान खासदार व महायुतीचे उमेदवार राजू शेट्टी यांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर वाळवा तालुक्यातील त्यांच्या समर्थकांसह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच जल्लोषाला सुरुवात केली. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करीत मोटारसायकल रॅली काढून विजयोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली होती. शहरातील सर्वच भागांमध्ये फटाक्यांची आतषबाजी सुरु होती. सकाळपासून मतमोजणीचा कल आणि खासदार राजू शेट्टी यांची आघाडी समजताच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार व त्यांच्या समर्थकांनी विजयोत्सवाला सुरुवात केली. भगवे ध्वज, शिट्ट्यांचा दणदणाट करीत मोटारसायकलवरुन रॅली काढून जल्लोष केला. तहसील कचेरी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करुन शिवसैनिकांनी जल्लोष केला. यल्लम्मा चौक येथे २५ औटांची विजयी सलामी देताना शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला होता. उरुण परिसरातील दादा पाटील यांनी सकाळी ८ वाजल्यापासूनच औटांची आतषबाजी करायला सुरुवात केली होती. भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमभाऊ पाटील यांच्या समर्थकांनी शहरातील प्रमुख मार्गावरुन रॅली काढून भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गोपीनाथ मुंडे, पूनम महाजन, राजू शेट्टी, संजय पाटील यांच्या विजयाच्या घोषणा देत पालिका प्रवेशद्वारासमोरही जल्लोष केला. ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या कासेगावमध्ये शेट्टी समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत विजयोत्सव साजरा केला. दुपारी सर्व कार्यकर्ते एकत्रित जमा झाले. यावेळी राजू शेट्टी यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. लोकसभा निवडणुकीतील दणदणीत विजयाचे संकेत स्पष्ट होताच कृष्णाकाठच्या परिसरातील खासदार शेट्टी यांच्या बिनीच्या शिलेदारांनी येडेमच्छिंद्र येथे जाऊन क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. येडेमच्छिंद्र, शिरटे, नरसिंहपूर, बहे, हुबालवाडी, खरातवाडी, साखराळे, बोरगाव या कृष्णाकाठच्या गावांमधून मोटारसायकल रॅली काढून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. कामेरी (ता. वाळवा) येथे राजू शेट्टी यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करीत विजयोत्सव साजरा केला. त्यानंतर गावातील प्रमुख मार्गावरुन मोटारसायकल रॅली काढली. रात्री उशिरापर्यंत कामेरीत फटाक्यांची आतषबाजी सुरु होती. त्याचबरोबर विठ्ठलवाडी येथेही राजू शेट्टी यांचा विजयोत्सव साजरा झाला. (वार्ताहर)