शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर नगरपालिका कर्मचाऱ्यांचा संप मागे

By admin | Updated: July 24, 2014 00:30 IST

पगाराची रक्कम अनुदानातून : गेले नऊ दिवस सुरू होता संप

इचलकरंजी : राज्यातील नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या पगाराची रक्कम शासकीय अनुदानातून देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्यामुळे नगरपालिका कर्मचाऱ्यांचा गेले नऊ दिवस सुरू असलेला संप संपुष्टात आला. नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी १५ जुलैपासून नगरपालिका कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने संप सुरू करण्यात आला होता. संपामध्ये राज्यातील सर्व २५७ नगरपालिका उतरल्याचा दावा संघटनेच्या वतीने केला होता. त्यानंतर १७ जुलैला नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांच्याबरोबर मागण्यांसंदर्भात समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची सविस्तर चर्चा झाली होती. या मागण्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर ठेवून निर्णय घेऊ, असे आश्वासन राज्यमंत्र्यांनी दिले होते. नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारचा दृष्टिकोन सकारात्मक राहील, अशी ग्वाही देत राज्यमंत्र्यांनी संप मागे घेण्याचे आवाहनही केले होते; पण समन्वय समितीने संप पुढे सुरू ठेवला होता.आज, बुधवारी मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृहात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री चव्हाण, राज्यमंत्री उदय सामंत, नगरपालिका प्रशासन संचालक पुरुषोत्तम भापकर यांची समन्वय समितीचे अध्यक्ष विश्वनाथ घुगे, डॉ. डी. एल. कराड, उपाध्यक्ष सुभाष मोरे, भाऊसाहेब पाटील, कार्याध्यक्ष धनंजय पळसुले, राष्ट्रवादी कॉँग्रेस औद्योगिक सेलचे सरचिटणीस सुभाष मालपाणी, इचलकरंजीचे नगरसेवक रवी रजपुते, आदींबरोबर चर्चा झाली. सुमारे एक तास झालेल्या चर्चेमध्ये मुख्यमंत्र्यांनी, नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या पगाराची रक्कम शासकीय अनुदानातून अदा करण्यात येईल; तसेच रोजंदारी व हंगामी कामगारांना कायम करण्याविषयी शासनाचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. त्याचबरोबर अन्य मागण्यांचाही सहानुभूतीने विचार करू, असे आश्वासन दिले.बैठकीनंतर समन्वय समितीचे अध्यक्ष घुगे व डॉ. कराड यांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत संप मागे घेण्याची घोषणा केली. (प्रतिनिधी)