शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
2
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
3
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
4
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
5
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
6
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
7
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
8
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
9
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
10
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
11
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
12
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
13
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
14
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
15
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
18
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
19
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
20
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!

तब्बल १८ वर्षांनंतर आई-मुलाची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 01:01 IST

जहॉँगीर शेख ।लोकमत न्यूज नेटवर्ककागल : तो सध्या राहत होता कागलमध्ये. त्याचे नातेवाईक कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी गावातील, तर आई माहेरी म्हणजे सांगली जिल्ह्यातील मांजर्डे गावात राहते. असे हे सर्वजण जवळपास असूनही तो गेली अठरा वर्षे ‘अनाथ’ म्हणून जीवन जगला. कागलमधील काही सामाजिक कार्यकर्ते त्याचे लग्न ठरविण्यासाठी त्याचे किमान रेशनकार्ड, आधारकार्ड ...

जहॉँगीर शेख ।लोकमत न्यूज नेटवर्ककागल : तो सध्या राहत होता कागलमध्ये. त्याचे नातेवाईक कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी गावातील, तर आई माहेरी म्हणजे सांगली जिल्ह्यातील मांजर्डे गावात राहते. असे हे सर्वजण जवळपास असूनही तो गेली अठरा वर्षे ‘अनाथ’ म्हणून जीवन जगला. कागलमधील काही सामाजिक कार्यकर्ते त्याचे लग्न ठरविण्यासाठी त्याचे किमान रेशनकार्ड, आधारकार्ड काढण्यासाठी कागदपत्रे गोळा करीत असताना त्याच्या नातेवाइकांचा शोध लागला. तब्बल १८ वर्षांनंतर या आई-मुलाची आणि बहीण-भावाची भेट झाली. चित्रपटातील एका कथेप्रमाणे हा प्रवास घडला आहे विजय सुरेश उबाळे (मूळ गाव दानोळी, ता. हातकणंगले) या युवकाचा.१९९९ च्या सुमारास विजय याची आई छाया ही कौटुंबिक वादातून माहेरी मांजर्डे (ता. तासगाव, जि. सांगली) येथे निघून गेली. तिच्यासोबत त्याच्या दोन बहिणी शिल्पा आणि चैताली यादेखील गेल्या. तेव्हा विजय पाच ते सहा वर्षांचा असेल, तर बहिणींचे वय आठ आणि दुसरीचे दहा असे होते. वडिलांनी मुलगा म्हणून स्वत:कडे ठेवून घेतले. नंतर काही दिवसांत वडिलांचे निधन झाले. कौटुंबिक वाद इतका टोकाचा होता की, आई अंत्यविधीलाही येऊ शकली नाही. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर विजयला मिरजेच्या अनाथालयात ‘अनाथ’ म्हणून दाखल केले गेले. तेथून दोन वर्षांनंतर त्याची कोल्हापुरात बाल निरीक्षणगृहात रवानगी करण्यात आली. तेथे काही वर्षे गेल्यानंतर तो कणेरीवाडी येथील अनाथालयात आला. लहान वयात ‘अनाथ’ असल्याचा पक्का समज त्याच्या डोक्यात बसल्याने तसेच त्याच्याकडे कोण नातेवाईकही फिरकले नसल्याने विजय हादेखील सर्व विसरून गेला. बघता बघता ही दहा वर्षे निघून गेली. दहावी परीक्षेनंतर त्याला निरीक्षणगृहातून बाहेर पडावे लागले. कागलमध्ये बाल निरीक्षण गृह चालविणाऱ्या प्रशांत वाळवेकरांनी त्याला आधार दिला. ‘अनाथ’ म्हणून सर्वजण त्याला सहानुभूती दाखवत. वनमित्र संघटनेचे अशोक शिरोळे, सुनील जाधव, आदींनी त्याचे वय लक्षात घेऊन त्याचे लग्न करून द्यावे असा विचार केला. त्यासाठी त्याचे आधार कार्ड, रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र बनविण्यासाठी कागदपत्रे जमा करण्यास सुरुवात केली. तेव्हा बाल निरीक्षण गृहातील कागदपत्रे तपासता तपासता ते थेट पोहोचले सांगलीच्या शासकीय रुग्णालयात. तेथे त्याचा ‘दानोळी’ गावचा पत्ता मिळाला. दानोळीत गेल्यानंतर सर्व भाऊबंद सापडले, तर त्या ठिकाणी आईचा पत्ता सापडला आणि अशोक शिरोळे, सुनील जाधव हे विजयला घेऊन तासगाव तालुक्यातील मांजर्डे गावात पोहोचले आणि ही १८ वर्षांची ताटातूट अखेर संपुष्टात आली.बहिणींची लग्नेही झालीविजयची आई छाया हिने माहेरी राहून काबाडकष्ट करून दोन्ही मुलींना मोठे केले. मुलगा कोठेतरी हरवून गेला आहे असे समजून त्यांनी चौकशी सोडली. सासरी दानोळीला येण्यास मनाईच होती आणि भाऊ या परिसरातच असताना दोन्ही बहिणींची लग्नेही झाली. त्यांचा संसार सुखात सुरू आहे. १८ वर्षांनंतर भेटलेल्या मुलाला पाहून आईच्या डोळ्यांत अश्रू आलेच, पण लेकीच्या लेकाला पाहून वृद्ध भामाबार्इंनाही आसवे रोखता आली नाहीत.