कोल्हापूर : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणातील विशेष सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी नवी मुंबई पोलिसांबद्दल नाराजी व्यक्त करीत, तसे लेखी मुख्यमंत्र्यांना कळविले आहे. खटला हातात घेतल्यापासून तपास अधिकारी किंवा गुन्हे अन्वेषण विभागाचा कोणताही अधिकारी माहिती देण्यासाठी पुढे आलेला नाही, असे घरत यांनी पत्रात नमूद केले आहे.अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधार अभय कुरुंदकर (रा. भार्इंदर पूर्व, जि. ठाणे), ज्ञानदेव पाटील ऊर्फ राजू पाटील (रा. तळवेल, जि. जळगाव), कारचालक कुंदन भंडारी, महेश फळणीकर (रा. आजरा) या चौघांना अटक केली आहे. प्रदीप घरत घरत यांनी खटल्याचे काम हाती घेतल्यापासून तपास अधिकारी किंवा गुन्हे अन्वेषण विभागाचा कोणताही अधिकारी त्यांना भेटलेला नाही. या गुन्ह्याबाबत त्यांना माहितीही दिलेली नाही. न्यायालयानेही नवी मुंबई पोलिसांच्या तपासाबद्दल नाराजी व्यक्तकेली आहे.
नवी मुंबई पोलिसांकडून वकिलांना सहकार्य नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 05:46 IST