शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

गुंतवणुकीशिवाय शेतीत फायदा अशक्य

By admin | Updated: June 27, 2016 01:14 IST

मुख्यमंत्री फडणवीस : ‘शाहू’च्या सहकार्याने सिंचनाचा पथदर्शी प्रकल्प

कोल्हापूर : ज्या क्षेत्रावर सध्या ५५ टक्के लोकसंख्या अवलंबून आहे, त्या शेती क्षेत्राचा सकल उत्पादनातील हिस्सा जेमतेम अकरा टक्के आहे. आतापर्यंत आपण शेतीला फक्त कर्ज देत आलो आहोत. त्यामध्ये भांडवली गुंतवणूक केलेली नाही. यापुढे शेतीत गुंतवणूक केल्याशिवाय ती फायद्याची होणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी कागल येथे केले. आजच्या महाराष्ट्रापुढील शेती व दुष्काळाचे सगळे प्रश्न सोडविण्याची ताकद राजर्र्षी शाहूंच्या विचारांमध्ये असल्याचे गौरवोद्गारही मुख्यमंत्र्यांनी या समारंभात काढले.शाहू कारखान्यावर आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या पुढाकाराने हा मेळावा झाला. ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती; परंतु तशी कोणतीही राजकीय चर्चा यावेळी झाली नाही. स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांच्या प्रेरणेतून कागल शहरात उभारण्यात आलेल्या राममंदिराचा लोकार्पण सोहळा आणि शेतकरी मेळावा असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. कारखाना कार्यस्थळावरील सभामंडपात हा दिमाखदार सोहळा झाला. मुख्यमंत्री म्हणाले, ‘अज्ञान, कमी जमीनधारणा, भांडवलाची कमतरता आणि बाजाराची सोय नाही या शेतीपुढील खऱ्या अडचणी आहेत, हे राजर्षी शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी ओळखले होते. आजच्या महाराष्ट्राची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. तंत्रज्ञान नसल्याने शेती परडवत नाही. आम्ही कर्ज देतो; परंतु शेतीत गुंतवणूक करत नाही. शेती खऱ्या अर्थाने ३५ टक्के लोकांनाच रोजगार देते; परंतु अन्य २० टक्के लोकांना दुसरे काही काम नसल्याने त्यांचा भार शेतीवर आहे. हा भार कमी करून तिला सेवा आणि उद्योग क्षेत्रांशी जोडल्यावरच शेती परवडेल.’ (प्रतिनिधी)साखर उद्योगाची पुनर्रचना करा साखर कारखानदारीने ‘साखर’ हा बायप्रॉडक्ट (उपपदार्थ) समजून या उद्योगाची पुनर्रचना केल्याशिवाय यापुढील काळात शेतकऱ्यांना एफआरपी देणे शक्य होणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी इथेनॉलसह उत्पन्नाचे अन्य मार्ग शोधले पाहिजेत.’ मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘विक्रमसिंह घाटगे यांच्या दूरदृष्टीमुळे शाहू कारखान्याने उपसा सिंचन योजना उभारल्या व त्या फायद्यात आणून चालवून दाखविल्या. हा प्रयोग राज्यभर नेण्यासाठी सूक्ष्म सिंचनामध्ये ‘शाहू’चे सहकार्य घेऊन राज्य शासन आणि ‘नाबार्ड’च्या मदतीने पथदर्शी प्रकल्प आम्ही राबवू.’‘मी तर छत्रपतींचा सेवक’मुख्यमंत्री झाल्यावर मी छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक झालो. त्यांच्या विचारानेच काम करण्याचा संकल्प केला. मी त्यांचा सेवक आहे. संभाजीराजे यांच्या खासदारपदी निवडीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्याच सेवकाच्या भूमिकेतून केवळ लखोटा घेऊन जाण्याचे काम केले, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी कागलमध्ये लगावला. छत्रपतींनी पेशव्यांची नियुक्ती केली आणि पेशव्यांनी फडणवीस नेमले. परंतु, इथे तर फडणवीस यांनीच छत्रपतींची नियुक्ती केल्याची टीका संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेवरील नियुक्तीबद्दल शनिवारी राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी केली होती. त्यास मुख्यमंत्र्यांनी असे प्रत्युत्तर दिले. संभाजीराजेंची नियुक्ती ही पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांनी शाहूंच्या विचारांचा सन्मान म्हणून केली असल्याचेही त्यांनी सांगितले.