शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

‘अवनि’ने घेतले बाळ-बाळंतिणीला दत्तक

By admin | Updated: December 4, 2015 00:22 IST

भवानी मंडपात प्रसूती : सीपीआरमध्ये भेट घेऊन साहित्य भेट

कोल्हापूर : सासर व माहेरच्या लोकांनी बेदखल केलेल्या अर्चना सुरेश आडी (वय ३१) या गर्भवती महिलेची बुधवारी भवानी मंडपामध्ये उघड्यावरच प्रसूती झाली. या निराधार महिलेला गुरुवारी ‘अवनि’ सामाजिक संस्थेने आधार देत ‘बाळ-बाळंतिणी’ला दत्तक घेतले. संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले व सहकाऱ्यांनी सीपीआर रुग्णालयात भेट घेऊन तिला व बाळाला उपयोगी साहित्य भेट दिले.अर्चना आडी यांचे पाच वर्षांपूर्वी संकेश्वर (जि. बेळगाव) येथील सुरेश आडी यांच्याशी लग्न झाले. त्यांचे माहेर व्यंकटेशनगर, शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील आहे. त्या आठ महिन्यांच्या गरोदर असताना पतीने त्यांना महिन्याभरापूर्वी घराबाहेर काढले. त्यानंतर त्या शिरोली पुलाची येथे माहेरी भावाकडे आल्या; परंतु या ठिकाणी जेमतेम दहा ते बारा दिवस राहिल्या. त्या ठिकाणीही त्यांना येथे राहू नकोस, असे सांगण्यात आले. त्यामुळे त्या भटकत-भटकत भवानी मंडपात आल्या. मंगळवारी मध्यरात्री भवानी मंडपातच त्यांची प्रसूती झाली.गुरुवारी दुपारी अवनि संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांच्यासह पुष्पा पठारे, जयश्री कांबळे, फ्रान्सिस डिसोझा, कॉट पसोरा, आदींनी सीपीआर रुग्णालयात जाऊन अर्चना व तिच्या बाळाची भेट घेतली. तिची विचारपूस करून आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, असा धीर देत ब्लँकेट, चादर, बाळाचे कपडे, खाद्य पदार्थ, साड्या हे साहित्य तिला दिले. आम्ही तुला व बाळाला दत्तक घ्यायला तयार असल्याचे तिला सांगितले. यावर मी माहेरी किंवा सासरी जाणार नाही, तुमच्यासोबत येईन असे ‘अवनि’च्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे चार दिवसांनंतर डिस्चार्ज मिळाल्यावर ‘बाळ-बाळंतिणी’ला अवनि संस्था नेणार आहे. यावेळी अनुराधा भोसले यांनी डॉक्टरांशी चर्चा करून माय-लेकरांच्या तब्येतीची माहिती घेतली. त्यांच्याकडून दोघांचीही तब्येत चांगली असल्याचे सांगण्यात आले. यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद उपस्थित होते.